मुंबई- टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम '' बद्दलचे वाद काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. कार्यक्रमावर निरनिराळे आरोप केले जातायत. चाहतेही कार्यक्रमावर टीका करत आहेत. सुरुवातीला कार्यक्रमात पाहुणे परीक्षक म्हणून आलेल्या अमित कुमार यांनी धक्कादायक खुलासा करत स्पर्धकांचं खोटं कौतुक करायला सांगण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर कार्यक्रमाच्या पहिल्या सीजनचा विजेता अभिजीत सावंतने कार्यक्रमात स्पर्धकांच्या गायकीऐवजी घरची गरिबी दाखवण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. आता बॉलिवूडची लोकप्रिय गायिका हिनेदेखील धक्कादायक खुलासा केला आहे. सुनिधी 'इंडियन आयडल' च्या पाचव्या आणि सहाव्या सीजनची परीक्षक होती. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिधीने खुलासा करत म्हटलं, 'मी कधीही नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांना स्पर्धकांची चूक दाखवताना पाहिलं नाही. आपण अमित कुमार यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी म्हटलं होतं की, निर्मात्यांनी त्यांना स्पर्धकांचं कौतुक करायला सांगितलं होतं. काय उद्देश आहे या कार्यक्रमाचा? फक्त कार्यक्रमाला पुढे चालू ठेवायचा? टीआरपीसाठी लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घ्यायचं? मलादेखील अमित कुमार यांच्याप्रमाणेच सांगण्यात आलं होतं.' पुढे सुनिधीने म्हटलं, 'मी पाचव्या आणि सहाव्या सीजनची परीक्षक होते. मला कॅमेरावर येण्यापूर्वीच सांगण्यात आलं की तुम्हाला स्पर्धकांचं कौतुक करायचं आहे. मला ते मुळीच पटलं नव्हतं. पण त्याहून धक्कादायक म्हणजे मी जर तसं केलं नाही तर मला कार्यक्रमातून काढून टाकण्यात येईल असंही सांगण्यात आलं. मी 'दिल है हिंदुस्तानी', 'द वॉइस' मध्येही परीक्षक राहिले पण तिथे मी सत्य सांगू शकत होते. तुम्ही जे वागता त्यामुळे स्पर्धकांचं नुकसान होतंय. त्यांना आणखी चांगलं करण्याची गरज वाटत नाही. त्यांचं भविष्य अंधारात जातंय. प्रसिद्धी मिळाल्याने त्यांचं लक्ष गाण्यावर कमी आणि खोट्या गोष्टी सांगण्यावर जास्त आहे.' सुनिधीच्या या खुलाशानंतर 'इंडियन आयडल १२' च्या टीमकडून कोणती प्रतिक्रिया येते याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3p6Vp0b