नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे अनेक जबरदस्त रिचार्ज प्लान आहेत. या रिचार्ज प्लानमध्ये अनेक फायदे जोडून टेलिकॉम कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या एका स्वस्त प्लानची तुलना या ठिकाणी करण्यात आली आहे. हा रिचार्ज प्लान २४९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये रोज मिळणाऱ्या डेटात जिओ अन्य कंपन्यांच्या तुलनेत पुढे आहे. २४९ रुपयांच्या प्लान संबंधी जाणून घ्या सर्वकाही. वाचाः जिओचा २४९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा रिलायन्स जिओच्या २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानल कंपनीची वेबसाइट मध्ये सुपर व्हॅल्यू (Super Value) प्लान म्हटले आहे. या रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सोबत १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमद्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः एअरटेलचा २४९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा एअरटेलकडे २४९ रुपयांचा व्हॅल्यू प्लान आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. जिओच्या तुलनेत हा प्लान थोडा कमीच आहे. वाचाः वोडाफोन-आयडियाचा २४९ रुपयांचा प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा वोडाफोन आयडियाचा २४९ रुपयांचा प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. जिओच्या २४९ रुपयांच्या तुलनेत या प्लानमध्ये कमी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये Binge All Night offer (रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा) आणि विकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळते. यात ५ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. याशिवाय, Vi Movies & TV चे क्लासिक अॅक्सेस मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Rbekud