Full Width(True/False)

OnePlus ची नवीन स्मार्टवॉच लाँच, झोप आणि ऑक्सिजनला करणार ट्र्रॅक, पाहा किंमत

नवी दिल्लीः वनप्लस वॉच () चे नवीन स्पेशल एडिशन नुकतेच कंपनीने टीज केले होते. आता चीनने या वॉचचे कोबाल्ट लिमिटेड एडिशनला (Cobalt Limited Edition) लाँच केले आहे. सोबत याच्या किंमतीचा खुलासा केला आहे. कंपनीने या स्मार्टवॉचला OnePlus 9 सीरीज सोबत मार्च महिन्यात आणले होते. वाचा : किंमत किती आता या स्मार्टवॉचला दोन व्हेरियंट क्लासिक एडिशन आणि कोबाल्ट एडिशनमध्ये उपलब्ध केले आहे. कंपनीने नवीन स्मार्टवॉचची किंमत १५९९ युआन म्हणजेच जवळपास १८ हजार रुपये किंमत ठेवली आहे. सध्या या स्मार्टवॉचला चायनीज ई-कॉमर्स वेबसाइट JD.com वरून खरेदी करता येऊ शकते. स्मार्टवॉचची विक्री १७ मे २०२१ पासून सुरू होणार आहे. कोबाल्ट एडिशनची किंमत क्लासिक एडिशन पेक्षा ६० टक्के जास्त आहे. वाचाः स्मार्टवॉचचे खास वैशिष्ट्ये क्लासिक एडिशन प्रमाणे वनप्लस वॉच कोबाल्ट एडिनशन मध्ये 316L स्टेनलेस स्टीलची सुविधा दिली आहे. परंतु, कोबाल्ट अलॉय फ्रेम सोबत येते. यात सर्कुलर शेपचे डायल मिळते. ज्यावर सफायर ग्लास कवर आणि चारही बाजुंनी गोल्ड कलर फिनिश दिली आहे. यात लेदर आणि फ्लोरो रबर स्टँम्पचे ऑप्शन दिले आहे. वाचाः कोबाल्ट एडिशनचे पॅकेजिंग रिटेल बॉक्स सुद्धा नवीन लग्जरी डिझाइन मध्ये येते. दोन्ही व्हेरियंट्सच्या लूक मध्ये थोडे अंतर जरूर आहे. परंतु, स्मार्ट वैशिष्ट्ये आणि फीचर्स एकसारखेच आहेत. स्मार्टवॉच अजुनही 454x454 पिक्सल रिज़ॉल्यूशनच्या 1.39 इंच AMOLED डिस्प्ले सोबत येते. यात १ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम इंटरनल स्टोरेज दिली आहे. यात ब्लड ऑक्सिजन, स्लीप आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सोबत अॅक्टिविटी ट्रॅकर सारखे फीचर्स सोबत येते. वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yaSKqr