नवी दिल्ली : लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड ब्रैंड ने Enco सीरिजचे नवीन लाँच केले आहे. हे शानदार लूक, कंफर्ट आणि फीचरसोबत येतात. ट्रू वायरलेस स्टीरियो सेगमेंटच्या या नवीन ईयरबड्सची साउंड क्वालिटी जबरदस्त आहे व याचे नॉइज रिडक्शन इतर कंपन्यांच्या मिड रेंज ईयरबड्सच्या तुलनेत अधिक चांगले असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ओप्पोच्या नवीन ईयरबड्समध्ये ३० तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल. वाचाः Oppo Reno 6 सीरिज स्मार्टफोन्ससोबत केले लाँच ओप्पोने फ्लॅगशिप च्या Oppo Reno 6, आणि Oppo Reno 6 Pro+ सारख्या स्मार्टफोन्ससोबत नवीन ईयरबड्स लाँच केले आहे. ओप्पोने रेनो ६ सीरिज स्मार्टफोस आणिन एन्को फ्री २ ईयरबड्सला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. गॅलेक्सी व्हाइट आणि एक्स्ट्रिम नाइट ब्लॅक रंगात उपलब्ध असलेल्या Oppo Enco Free 2 ची किंमत ५९९ युआन (जवळपास ६,८०० रुपये) आहे. चीनमध्ये याची विक्री ५ जून पासून सुरू होईल. कंपनी पुढील महिन्यात या ईयरबड्सला भारतात लाँच करू शकते. वाचाः Oppo Enco Free 2 ची वैशिष्ट्ये ओप्पोच्या नवीन ईयरबड्सच्या डिझाइन आणि वैशिष्ट्य सांगायचे तर अंडाकाराच्या चार्जिंग केससोबत येणारे हे ईयरबड्स सहज कानात फिट बसतील असा कंपनीचा दावा आहे. हे ईयरबड्स कंपर्टेबल आहेत. डिझाइनच्या बाबतीत अॅपलच्या AirPods Pro पासून प्रेरित आहे. ईयरबड्स चार्जिंग केसमधून काढताच स्मार्टफोनशी कनेक्ट होतात व कानातून काढल्यावर आपोआप म्युझिक थांबते. IP ५४ सर्टिफाइड वॉटर आणि डस्ट रजिस्टेंटसोबत येणाऱ्या या ईयरबड्सला सिंगल चार्जवर चार्जिंग केससोबत ३० तास वापरता येईल. Oppo Enco Free 2 Earbuds मध्ये अँटी विंड अल्गोरिदम आणि 3 मायक्रोफोनचा वापर करण्यात आला आहे, जे नॉइज रिडक्शनला मदत कतात. ईयरबड्सला ४७एमएस लो लेटेंसीसोबत सादर करण्यात आले आहे. ओप्पोच्या या ईयरबड्समध्ये ३ कोर नॉइज रिडक्शन चिपसेटसोबत सादर करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yMZqez