Full Width(True/False)

प्रीपेडवरून पोस्टपेड करा एका मिनिटात, फक्त एका OTP ने होणार काम, पाहा नवीन नियम

नवी दिल्लीः तुमच्याकडे जर प्रीपेड सीम कार्ड असेल आणि तुम्हाला जर ते पोस्टपेड मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर आता फक्त एका मिनिटाचा वेळ लागतो. यासाठी ट्रायने नवीन गाइडलाइन जारी केली आहे. नवीन नियमानुसार, आता फक्त अवघ्या मिनिटात हे काम होणार आहे. यासाठी फक्त एका ओटीपीचे गरज आहे. त्यानंतर तुमचे सीम कार्ड प्रीपेड पासून पोस्टपेड होईल. या दरम्यान तुमच्या मोबाइलची सर्विस ३० मिनिटापेक्षा जास्त वाया जाणार नाही. जाणून घ्या नवीन पद्धत. वाचाः SMS ने पाठवा रिक्वेस्ट Prepaid ते Postpaid मध्ये convert करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलने SMS , IVRS, वेबसाइट किंवा अधिकृत App ने Request पाठवावी लागेल. तुमच्या नंबरवर येणार मेसेज रिक्वेस्ट मिळाल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक मेसेज येईल. मेसेज मध्ये लिहावे लागेल की, तुम्ही प्रीपेड पासून पोस्टपेड कन्व्हर्ट करण्यासाठी विनंती केली आहे. मेसेज मध्ये एक यूनिक ट्रान्झॅक्शन आयडी असणारआ हे. त्या सोबतच एक ओटीपी येईल. या ओटीपीला एक्सपायर होईपर्यंतची वेळ १० मिनिटे असणार आहे. वाचाः ओटीपीने होईल वैधता ओटीपीवरून वैधता केल्यानंतर तुमचे सीम कार्ड प्रीपेड वरून पोस्टपेड मध्ये कन्वर्ट होईल. तुम्हाला सांगितलेल्या तारखेला हे सीम कार्ड Subscriber ला टेक्स्ट किंवा IVRS कडून कन्वर्ट होण्याची तारीख सांगितली जाईल. यानंतर ठरलेल्या वेळेला तुमचे सीम कार्ड प्रीपेड वरून पोस्टपेड केले जाईल. या सर्विससाठी तुमच्या मोबाइलची सर्वित ३० मिनिटापेक्षा जास्त काळ बाधित राहणार नाही.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vm2a0A