Full Width(True/False)

Realme ने लाँच केला स्वस्त Bluetooth Speaker,अंधारात चमकणार, ९ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप

नवी दिल्लीः रियलमीने आपल्या नवीन कोबल ब्लूटूथ स्पीकर (Cobble Bluetooth Speaker) ला मलेशियात लाँच केले आहे. एक गेम मोड आणि ग्लो इन द डार्क डोरीचे हे स्पीकरमध्ये मोठी बॅटरी दिली आहे. या ब्लूटूथ स्पीकर मध्ये 1500mAh ची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यास ९ तासपर्यंत प्लेटाइम देते. तसेच याला रियलमी लिंक अॅप द्वारे चालवले जाऊ शकते. वाचाः युजर आपल्या या पसंतीनुसार, याला सेटिंग्सला कस्टमाइज करू शकतात. कंपनीने सध्या हे स्पष्ट केले नाही की, हे ब्लूटूथ स्पीकर अन्य देशात सुद्धा लाँच करणार की, नाही. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ब्लूटूथ स्पीकर्सच्या फीचर्स संबंधी खास माहिती देत आहोत. वाचाः स्पीकर्सचे फीचर्स Realme Cobble Bluetooth Speaker मध्ये एक चमकदार छोटी दोरी दिली आहे. त्यामुळे याला कुठे ठेवल्यानंतर शोधायला सोपे जाते. याला ग्लो इन द डार्क फीचर च्या द्वारे अंधारात सहज शोधता येते. या स्पीकर मध्ये दमदार बेस साठी पेसिव बेस रेडिएटर सोबत डायनेमिक ड्रायवर दिले आहे. या ब्लूटूथ स्पीकर मध्ये ५ वॉट साउंड आउटपूट दिले आहे. रियलमीच्या या ब्लूटूथ स्पीकरमध्ये स्टीरियो इक्विपमेंट फीचर सह तीन इक्वलाइजर प्रीसेट बेस, ब्राइट आणि डायनामिक दिले आहेत. हे ब्लूटूथ स्पीकर IPX5 रेटिंग सोबत येते. याला आऊटडोर मध्ये सोप्या पद्धतीने वापरता येऊ शकते. या स्पीकरला पाण्यात ठेवून त्याचा वापर करता येऊ शकत नाही. वाचाः Realme Cobble ब्लूटूथ स्पीकर मध्ये ब्लूटूथ v5.0 दिली आहे. बॅटरी बॅकअप साठी यात 1500mAh ची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जवर ९ तासांपर्यंत चालवले जाऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, ब्लूटूथ केवळ २.५ तासात फुल चार्ज केले जावू शकते. या ब्लूटूथ स्पीकरला Realme Link द्वारे चालवले जाऊ शकते. याच्या सेटिंग्समध्ये जाऊन म्यूझिक कंट्रोल केले जाऊ शकते. Realme Link अॅप अँड्रॉयड स्मार्टफोन साठी उपलब्ध आहे. Realme Cobble Bluetooth Speakerची किंमत ९९ MYR म्हणजेच १८०० रुपये आहे. कलर ऑप्शनमध्ये हे मेटल ब्लॅक आणि इलेक्ट्रिक ब्लू अशा दोन रंगात उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nNZ8yY