नवी दिल्ली : करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असले तरीही याचा परिणाम स्मार्टफोन्सच्या विक्रीवर झालेला नाही. पुढील आठवड्यात भारतीय बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहेत. यात फोन आणि सह आणि ASUS Zenfone 8 series फोन्सचा समावेश आहे. ११ आणि १२ मे ला आयोजित HTC Vivecon मध्ये एचटीसीचे मोबाइल्स लाँच होऊ शकतात. या फोन्सविषयी जाणून घेऊया. वाचाः ASUS Zenfone 8 Series पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये ASUS Zenfone 8 Series चे फोन्स प्रीमियम सेगमेंटमध्ये असतील. फ्लॅगशिपमध्ये जेनफोन ८ सीरिजचे फोन १२ मे ला जागतिक बाजारात लाँच होणार आहेत. यात Asus ZenFone 8 Pro आणि Asus ZenFone 8 स्टँडर्ड व्हर्जनसोबतASUS ZenFone 8 Mini फोन देखील आहे. भारतात हे लाँचिंग बुधवारी सायंकाळी सोशल मीडिया व युट्यूबवर पाहता येईल. Redmi Note 10S १३ मे ला भारतात Redmi Note 10S लाँच करणार आहे, हा रेडमी नोट १० सीरिजमधील जबरदस्त फोन आहे. या फोनसोबतच रेडमी वॉच देखील लाँच होणार आहे. भारतात रेडमी नोट सीरिजची विक्री सर्वाधिक होते, त्यामुळे शाओमी आता लोकांना या सीरिजमध्ये अधिक पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. वाचाः Infinix Note 10 Pro बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये लोकप्रिय ब्रँढ इनफिनिक्स १३ मे ला भारतात Infinix Note 10 Pro लाँत करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत १० ते १५ हजार रुपयांमध्ये असेल. MediaTek Helio G95 प्रोसेसर, ६४ मेगापिक्सल प्रायमेरी रियर कॅमेरा फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारी ५०००mAh च्या बॅटरीसह अन्य जबरदस्त फीचर्स या फोनमध्ये मिळतील. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f75c1F