नवी दिल्लीः चीनची प्रमुख स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi भारतीय बाजारात आपली Redmi स्मार्टवॉच लाँच करण्याची तयारी करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी १३ मे रोजी Note 10S स्मार्टफोन सोबत आपला पहिला स्मार्टवॉचला लाँच करणार आहे. या स्मार्टवॉचची चर्चा खूप आधीपासून सुरू आहे. परंतु, आता लाँचच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. रेडमी इंडियाने सोशल मीडियावर आपल्या या पहिल्या स्मार्टवॉचचा एक टीजर जारी केला आहे. याला एका व्हर्च्युअल इव्हेंटमधून भारतीय बाजारात लाँच केले जाणार आहे. हे ऑनलाइन आणि कंपनीच्या अधिकृत डिलरशीपकडे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपल्या या स्मार्टवॉचला चीनच्या बाजारात लाँच केले होते. चीनमध्ये या स्मार्टवॉची किंमत ३ हजार ३५२ रुपये आहे. वाचाः स्मार्टवॉचची फीचर्स यात १.४ इंचाचा स्क्वॉयर शेप डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन (320x320) पिक्सल आहे. याची लांबी 41mm, रुंदी 35mm आणि जाडी 10.9mm आहे. यावर 2.5D टेम्पर्ड ग्लॉस दिला आहे. डिस्प्लेला सुरक्षित ठेवतो. ब्लूटूथ याला सपोर्ट करतो. यात हर्ट रेट, सिक्स अॅक्सिस, जिओमॅग्नेटिक आणि एम्बियंट लायटिंग सारखे खास सेन्सर दिले आहेत. चीनी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही स्मार्टवॉच वॉटर रेजिस्टेंस सारखे फीचर दिले आहे. त्यामुळे पाण्यात पडले तरी ही सुरक्षित राहते. यात 230 mAh ची क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, याला फुल चार्ज होण्यासाठी फक्त २ तास लागतात. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर १२ तासांपर्यंत चालते. वाचाः किती असेल किंमत स्क्वॉयर शेप डायलच्या या स्मार्टवॉचच्या बॅटरीत १२ तासांचा बॅटरी बॅकअप दिला आहे. कंपनी त्याच किंमतीत भारतात या स्मार्टवॉचला लाँच करू शकते. जी चिनच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रेडमीच्या या स्मार्टवॉचमध्ये ५ वेगवेगळे मोड्स दिले आहेत. ज्यात इनडोर रनिंग, ट्रेडमील, ऑउटडोर रनिंग, इनडोर आणि आउटडोर सायकलिंग, स्विमिंग आणि फ्री अॅक्टिविटीचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eXhppx