नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना एकापेक्षा एक दमदार प्लॅन्स लाँच करत आहे. आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी कंपनीने काही प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनी अनेक प्लॅन्समध्ये डबल डेटा देखील ऑफर करत आहे. अनेक ग्राहक ८४ दिवसांच्या प्लॅन्सला पसंती देताना दिसत आहे. अशाच व्हीआयच्या ८४ दिवसांच्या धमाकेदार प्लॅन्सबाबत जाणून घेऊया, जो जिओ आणि एअरटेलच्या प्लॅन्सला टक्कर देत आहे. वाचा : व्हीआयचे ८४ दिवसांची वैधता असणारे अनेक प्लॅन्स आहेत. यात ८०१ रुपयांच्या प्लॅनचा देखील समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा मिळत आहे. सोबतच, ४८ जीबी अतिरिक्त डेटा बोनस देखील दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना या प्लॅनमध्ये एकूण ३०० जीबी डेटा मिळतो. भारतात सध्या इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी हाय-क्वालिटी ४जी नेटवर्कसोबत ८४ दिवसांच्या कालावधीसाठी ३०० जीबी डेटा देत नाही. या व्यतिरिक्त ग्राहकांना प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एमएमएसची सुविधा देखील मिळते. वाचा : या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक वर्षांसाठी ३९९ रुपये शुल्क असलेला डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे स्बस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. तसेच, बिंज ऑल नाइट (रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत डेटा फ्री), विकेंड डेटा रोलओव्हर आणि व्हीआय मूव्हीस अँड टीव्हीचे एक्सेस देखील ग्राहकांना मिळतो. दुसरीकडे जिओ ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवस वैधतेसह दररोज ३ जीबी डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये बिंज ऑल नाइट, डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपी आणि विकेंड डेटा रोलओव्हरचे फायदे मिळत नाहीत. असा कोणताच प्लॅन ऑफर करत नाही. अशात जिओच्या प्लॅन पेक्षा व्होडाफोन-आयडियाचा प्लॅन अधिक फायद्यांसह येतो. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wqI0SS