मुंबई: ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी नेहमीच काहीतरी असं करते की लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधलं जातं. जेव्हा राखी सावंत बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली त्यावेळी बिग बॉसच्या घरात तिनं आपल्या पती रितेशचा उल्लेख केला होता. अर्थात राखीच्या नवऱ्याचा मुद्दा याआधीही अनेकदा चर्चेत आला आहे. पण आता राखी चक्क मस्तानीच्या वेशात मुंबईच्या रस्त्यांवर बाजीरावच्या शोधात निघालेली दिसली. यावेळी तिनं आता नवऱ्याला भेटण्याची कोणतीच आशा राहिली नसल्याचंही सांगितलं. राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती चित्रपट ''च्या मस्तानीचा वेश करून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. या व्हिडीओत तिनं आपण बाजीरावच्या शोधात निघल्याचं म्हटलं आहे. राखीला खरंतर नवऱ्याला भेटण्याची एक संधी मिळाली होती पण असं होऊ शकलं नाही. व्हिडीओमध्ये राखी म्हणते, 'ना लस मिळत आहे. ना कपड्यांची दुकानं उघडत आहेत त्यामुळे आता मी भटकत आङे. ना मुंबईत सर्वकाही ठीक होत आहे आणि लॉकडाऊनही कायम आहे. मी खूप त्रासले आहे. मी खूप दुःखी आहे.' राखी पुढे म्हणाली, 'मी 'खतरों के खिलाडी'मध्येही जाऊ शकले नाही आणि विवाहित असूनही माझा पती मला भेटत नाहीये. एक शो मला मिळाला होता 'नच बलिए' पण आता हा शो देखील बंद करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ही एक संधी होती माझ्याकडे माझ्या नवऱ्याला भेटण्याची. पण आता हा शो बंद झाल्यामुळे मला त्याला कधीच भेटता येणार नाहीये. तुम्ही मला मीरा म्हणा किंवा मस्तानी मी माझ्या बाजीरावला शोधत आहे.' राखी हे सर्व बोलत असताना त्या ठिकाणी एक डब्बेवाला येतो. त्याला पाहिल्यावर राखी म्हणते, 'तुम्ही बाजीराव आहात का?' त्यावर तो व्यक्ती म्हणतो, 'मी तर टिफिन पोहोचवण्याचं काम करतो.' त्यावर राखी त्याला म्हणते, 'मग ठीक आहे. मला वाटलं तुम्ही बाजीराव आहात. मी मस्तानी आहे. उद्यापासून मलाही टिफिन द्या.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SEPtzr