नवी दिल्ली : ५जी स्मार्टफोनची लोकप्रियता पाहता एकामागोमाग एक ५जी लाँच करत आहे. आता कंपनीने आणखी एक स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच केला आहे. विवोने सोबत स्मार्टफोनला लाँच केले आहे. स्पेसिफिकेशनच्या बाबतीत या दोन्ही फोनमध्ये बरेचसे साम्य आढळते. Vivo Y72 5G याआधी मार्च महिन्यात थायलंडमध्ये लाँच करण्यात आले होते. वाचाः Vivo Y52 5G फोनचे डिझाइन स्लीक असून, यात ५००० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ड्युअल सिम-सपोर्ट, एक्सपेंडेबल स्टोरेजसोबत येतो. फोन अँड्राइड ११ वर आधारित फनटच ओएसवर चालतो. Vivo Y52 5G स्पेसिफिकेशन
- ड्युअल-सिम (नॅनो) Vivo Y52 5G फोन हा अँड्राइड वर आधारित फनटच ओएस ११.१ वर चालतो. यात ६.५८ इंच फूल एचडी+ (१०८०x२४०८ पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला असून, यात ४GB रॅम आणि १२८GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल.
- कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात ऑटोफोकससोबत ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूट आणि २ मेगापिक्सल बोकेह लेंस मिळते. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
- कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनमध्ये १८वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
- विवोने अद्याप Vivo Y52 5G च्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. हा फोन ४जीबी आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. मात्र, हे एकच व्हेरिएंट असेल की नाही, याबाबत स्पष्टता नाही. दुसरीकडे कंपनीच्या Vivo Y72 5G ची किंमत EUR २९९ (जवळपास २६,७०० रुपये) आहे. या दोन्ही फोनला सध्या यूरोपमध्ये लाँच करण्यात आले आहे.
- दरम्यान, Vivo Y52s आणि Vivo Y52s (T1 व्हर्जन) ला चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आली आहे. Vivo Y52s ची सुरुवाती किंमत CNY १,५९८ (जवळपास १८,१०० रुपये) आणि Vivo Y52s (T1 व्हर्जन) ची सुरुवाती किंमत CNY २,०९९ (जवळपास २३,९०० रुपये) आहे. यातील कोणताही स्मार्टफोन अद्याप भारतात लाँच करण्यात आलेला नाही. कंपनीकडून यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fn4sp6