Full Width(True/False)

ट्विटरवर का ट्रेंड होत होतं We Love You Salman Khan

मुंबई: सध्या त्याचा अलिकडच्याच काळात रिलीज झालेल्या 'राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड केले आहेत. चित्रपटाला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. असं असताना आता सोशल मीडियावर '' ट्रेंड करत आहे. सलमान खानचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. सलमानच्या चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम सर्वांनाच माहीत आहे. आता सलमानचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यामुळे ट्विटरवर 'वी लव यू सलमान खान' ट्रेंड होताना दिसत आहे. यामध्ये चाहत्यांनी त्याच्या सामाजिक कामापासून ते त्याच्या चित्रपटांपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. याशिवाय त्यांनी सलमानला बॉक्स ऑफिस किंग म्हटलं आहे. तर अनेकांनी त्याच्या करोना काळातील मदतीचं कौतुक केलं आहे. याआधीही फेब्रुवारीमध्ये सलमानच्या चाहत्यांनी 'वी लव यू सलमान खान' ट्विटरवर ट्रेंड केलं होतं. त्यावेळी काळवीट शिकार प्रकारणातून सलमान खानला निर्दोष मुक्तता मिळाली होती. त्यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीचा किंग असं म्हणत चाहत्यांनी सलमानचं कौतुक केलं होतं. प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला '' चित्रपट १३ मे रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटा सलमान व्यतिरिक्त, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा, गौतमी गुलाटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रिलीजनंतर सलमानचा हा चित्रपट पायरसीचा शिकार झाला होता. त्यानंतर दिल्ली हायकोर्टानं असं करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SxLq7K