Full Width(True/False)

WhatsApp न्यू प्रायव्हसी पॉलिसी आजपासून लागू होणार, स्विकार न केल्यास काय होणार?, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपली नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू केली आहे. ही पॉलिसी स्विकारणे यूजर्ससाठी अनिवार्य आहे. नवीन पॉलिसी न स्विकारल्यास यूजरला व्हॉट्सअ‍ॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही. या पॉलिसी अंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. वाचाः व्हॉट्सअ‍ॅपच्या या प्रायव्हेसीवर टीका होत असतानाच आता कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात कंपनीने म्हटले आहे की, बहुतांश अ‍ॅप आणि वेबसाइट्स अशाच प्रकारची पॉलिसी ठेवतात व ते व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत अधिक डेटा जमा करतात. व्हॉट्सअ‍ॅपने या अ‍ॅप्सवर केला आरोप व्हॉट्सअ‍ॅपने याबाबत ५ मे ला न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात कंपनीने म्हटले आहे की, , , , , आणि Aarogya Setu सारखे यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट करतात. या याचिकेत Microsoft, Google, Zoom आणि Republic TV चॅनेलच्या डिजिटल साइटचा देखील उल्लेख आहे. कंपनीने म्हटले आहे की, अनेक इंटरनेट आधारित अ‍ॅप्स व वेबसाइटच्या प्रायव्हेसी पॉलिसीची समिक्षा केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की त्यांच्याद्वारे जमा केला जाणारा डेटा व्हॉट्सअ‍ॅपच्या २०२१ च्या अपडेट सारखाच आहे. अनेक अ‍ॅप्स यापेक्षा अधिक डेटा जमा करतात. कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या नवीन प्रायव्हेसी पॉलिसीला मंजूरी न मिळाल्यास देशातील टेक कंपन्यांना काम करण्यास अडचण येईल. यात सर्वाधिक अडचण किराणा डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना होईल. वाचाः दिल्ली उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यातच व्हॉट्सअ‍ॅपविरोधात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेत म्हटले होते की, नवीन प्रायव्हेसी पॉलिसीला स्विकार करायचे की नाही हे यूजर्सवर आहे. जर एखाद्या यूजर्सला अटी मान्य नसतील व अ‍ॅपचा वापर करायचा नसेल, तर करू नये. याच्या जागी दुसरा कोणताही अ‍ॅप वापरू शकता. नवीन प्रायव्हेसी पॉलिसी स्विकारली नाही तर काय होणार ? आज व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. कंपनीने नुकतेच या अटी मान्य न केल्यास काय होईल, याचे उत्तर दिले आहे. कंपनीनुसार, पॉलिसी न स्विकारल्यास अकाउंट डिलीट होणार नाही, मात्र फीचर्स मर्यादित केले जातील. म्हणजेच, काही ठराविक फीचर्सचाच वापर करता येईल.
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीला न स्विकारल्यास चॅट लिस्टचा वापर करता येणार नाही.
  • ऑडिओ व व्हिडीओ कॉलचे उत्तर देता येईल. तसेच, नॉटिफिकेशन इनेबल असल्यास त्यावर टॅप करून मेसेजला उत्तर देखील देता येईल.
  • मिस्ड कॉल अथवा व्हिडीओ कॉलला उत्तर देता येईल.
  • यूजर्सला पॉलिसी स्विकारण्यासाठी वारंवार रिमाइंडर पाठवले जाईल. जर तरीही पॉलिसी न स्विकारल्यास इनएक्टिव्ह यूजर्सची पॉलिसी लागू होईल व १०० दिवसांनी कंपनी तुमचे अकाउंट डिलीट करेल.
  • अकाउंट डिलीट केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बॅकअप मिळणार नाही व पुन्हा ते अकांउट सुरू करता येणार नाही.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33LyVYM