Full Width(True/False)

WhatsApp चे नवीन फीचर येतेय, व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी ऐकू शकाल ऑडियो

नवी दिल्लीः मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप अनेक दिवसांपासून व्हॉइस मेसेजच्या प्लेबॅक स्पीड (Playback Speed)वर काम करीत आहे. या फीचर अंतर्गत युजर्स कोणत्याही व्हॉइस मेसेजला वेगाने किंवा हळू स्पीडने ऐकू शकेल. सध्या हे फीचर टेस्टिंगच्या फेज मध्ये आहे. आता एका ताज्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप मेसेज संबंधी आणखी एक फीचर टेस्टिंग करीत आहे. या फीचर अंतर्गत कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी रिव्ह्यू केले जाऊ शकेल. वाचाः याप्रमाणे काम करणार नवीन फीचर सध्या तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणताही मेसेज पाठवायचा असेल तर माइक बटनला दाबून आवाज रेकॉर्ड करावी लागते. बटनला सोडल्यानंतर व्हॉइस मेसेज ऑटोमेटिकली जातो. परंतु, नवीन फीचरच्या आल्यानंतर युजर्संना आपला मेसेज पाठवण्याआधी ऐकण्याची सुविधा मिळते. सध्या युजर्संला मेसेज थेट सेंड करावा लागतो. रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या अॅप मध्ये एक रिव्ह्यू बटन (Review button) जोडणार आहे. यावर टॅप केल्यानंतर व्हॉइस मेसेज ऐकता येऊ शकतो. यानंतर युजर मेसेज ऐकू शकतात की, पाठवायचा की नाही. वाचाः आता मोठ्या साइज मध्ये दिसणार फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या युजर्संसाठी आणखी एक नवीन फीचर जारी केले आहे. नवीन फीचरद्वारे आता व्हॉट्सअॅप चॅट मध्ये फोटो आणि व्हिडिओ आधीच्या तुलनेत जास्त मोठे दिसणार आहे. आधी व्हॉट्सअॅप वर ज्यावेळी फोटो पाठवली जाते. त्यावेळी त्याचा प्रीव्ह्यू स्कॉयर शेपमध्ये दाखवली जात होती. म्हणजे फोटो लांब असेल तर ती प्रीव्ह्यू मध्ये कट होत होती. आता तुम्ही फोटो न ओपन करता पूर्णपणे पाहू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3teibn6