मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अनुष्काकडे सिनेमे नाहीत असे नाही परंतु सध्या ती मुलगी वामिकाकडे जास्त लक्ष देत आहे. अनुष्का सध्या सिनेमात काम जरी करत नसली तरी तिच्याकडे पैशांची कमतरता नाही. अनुष्काकडे किती पैसा आहे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. अनुष्काने तिच्या करिअरच्या सुरुवातील मॉडेलिंग केले आणि त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अभिनय करताना तिने मॉडेलिंगही केले असून अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये तिने काम केले आहे. तसेच तिचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस असून त्या माध्यमातूनही तिने भरभक्कम कमाई केली आहे. अनुष्काची संपत्ती फोर्ब्स मासिकामध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून अनुष्काचा उल्लेख अनेकदा करण्यात आला आहे. अनुष्काची एकूण संपत्ती सुमारे ३५ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास २६० कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. अनुष्काची जी मिळकत आहे त्यातील सर्वाधिक मिळकत ही ब्रँड एंडोर्समेंट आणि इन्व्हेंस्टमेंटमधून आहे. सिनेनिर्माती म्हणून ही अनुष्काने चांगली कमाई केली असून गेल्या ३ वर्षांत तिला ८० टक्के फायदा झाला आहे. आलिशान घर, गाड्या आणि प्रॉपर्टी अनुष्का शर्माने मुंबईत २०१४ मध्ये घर खरेदी केले, त्याची किंमत सुमारे ९ कोटी रुपये इतकी आहे. अनुष्का शर्माकडील गाड्यांबद्दल सांगायचे तर तिच्याकडे रोवल, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. अनुष्का प्रत्येक सिनेमासाठी साधारणपणे १२ कोटी रुपये तर जाहिरातीसाठी ४ कोटी रुपये इतके मानधन घेते. याशिवाय तिने रिअल इस्टेटमध्येही पैसे गुंतवले असून अनुष्काकडे सुमारे ३६ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. तीन वर्षांत एकही सिनेमा नाही अनुष्का शर्माने गेल्या ३ वर्षांत एकाही सिनेमात काम केलेले नाही. २०१८ मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत 'झीरो' सिनेमात काम केले होते. त्यानंतर तिने कोणताही सिनेमा साइन केला नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RkMOu5