Full Width(True/False)

48 MP सह दोन सेल्फी आणि 50 MP चा कॅमेराचा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्लीः टेक्नोने मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंत सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर दिला आहे. हा फोन सिंगल रॅम आणि दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये आणले आहे. कंपनीने आता या फोनची किंमत आणि उपलब्धता संबंधी कोणतीही माहिती दिली नाही. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः टेक्नो फँटम X चे फीचर फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा डिस्प्ले आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आणि 90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. फोनचा डिस्प्ले शेफ कटआउट, स्लीम टॉप, कर्व्ड एज आणि बॉटम बेजल्स सोबत येतो. फोनला दोन कलर मध्ये मॉनेट्स समर आणि स्टारी नाइट ब्लू मध्ये लाँच केले आहे. या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन दिले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक १३ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. टेक्नो फँटम एक्स ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून यात मीडियाटेक हीलियो G95 चिपसेट दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4700mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qqDJ05