नवी दिल्लीः ग्राहकांकडे भारतातील सर्वात ५जी फोनपैकी एक ला खरेदी करण्याची आज संधी आहे. पोकोचा हा भारतातील पहिला ५जी स्मार्टफोन आहे. या फोनचा सेल आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. स्मार्टफोनमध्ये 90Hz डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फीचर्स संबंधी. वाचाः Poco M3 Pro 5Gची किंमत आणि ऑफर Poco M3 Pro 5G स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मॉ़डलची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन कूल ब्लू , पॉवर ब्लॅक आणि पोको येलो मध्ये उपलब्ध आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी ५०० रुपयाची सूट देत आहे. बेस मॉडलला १३ हजार ४९९ रुपये आणि टॉप मॉडलला १५ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः फोनची फीचर्स Poco M3 Pro 5G स्मार्टफोन मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन ७०० प्रोसेसरचा इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात साउंड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकचे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wnVi2X