नवी दिल्ली. टेलिकॉम कंपनी Airtel ने आपले १७९ आणि २७९ हे दोन लोकप्रिय प्रीपेड प्लान्स बंद केले आहे . कंपनीच्या या दोन्ही प्लान्समध्ये, वापरकर्त्यांना जीवन विमा पॉलिसी ऑफर केल्या जात होत्या. ओन्लीटेकच्या अहवालानुसार हे दोन्ही प्लान्स आता कंपनीच्या अॅपमध्ये आणि वेबसाइटवर दिसणार नाहीत. एअरटेलच्या या दोन्ही प्लान्समध्ये मोफत कॉलिंग व मोफत मेसेजेससारखे अनेक फायदे उपलब्ध होते. वाचा : Airtel १७९ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येणार्या एअरटेलच्या या प्लानमध्ये कंपनीतर्फे देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज ३०० विनामूल्य मेसेजेस देण्यात येत होते. तसेच, इंटरनेट वापरासाठी यात २ जीबी डेटा उपलब्ध होता. या प्लानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने ग्राहकांना मासिक दोन लाख रुपयांचा जीवन विमा देखील यात दिला होता. Airtel २७९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता होती. तसेच, यात अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १.५ जीबी डेटा देखील मिळायचा. सोबतच, दररोज १०० मोफत मेसेजेस असलेल्या या प्लानमध्ये वापरकर्त्यांना ४ लाख रुपयांचा मासिक जीवन विमा देखील देण्यात येत होता. यात व्यंक म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम अॅपची विनामूल्य सदस्यता समाविष्ट आहे. सूरु केला ४५६ रुपयांचा नो-लिमिट प्लान एअरटेलने वापरकर्त्यांसाठी नुकताच हा नवीन प्लान सुरू केला आहे. यात कंपनी ६० दिवसांच्या वैधतेसह ५० जीबी डेटा देत आहे. एका दिवसातही वापरकर्ते हा डेटा वापरू शकतात. या प्लानमध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येत असून दररोज १०० विनामूल्य मेसेजेस देखील उपलब्ध आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qqi4oK