Full Width(True/False)

आधारच्या मदतीने फक्त १० मिनिटात बनवा ‘पॅनकार्ड’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : सध्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. इनकम टॅक्सद्वारे जारी केले जात असलेले हे कागदपत्र अनेक महत्त्वाच्या कामासाठी वापरले जाते. बँक अकाउंट उघडण्यापासून ते रिटर्नपर्यंत सर्व ठिकाणी याचा उपयोग होतो. मोठ्या व्यवहारांसाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे. ज्याप्रमाणे उपयोगी आहे, त्याच प्रमाणे पॅन कार्ड असणे देखील आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर त्वरित बनवायला हवे. वाचाः बॅन कार्ड बनवणे खूपच सोपे झाले आहे. तुम्ही पॅन कार्ड घरबसल्या स्वतः बनवू शकता व अगदी काही मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. पॅन कार्डला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सहज बनवता येईल. ऑनलाइन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊयात. () द्वारे आधार कार्ड जारी केले जाते. तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून पॅन कार्ड जारी केले जाते. तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज केल्यास अवघ्या १० मिनिटात पॅन कार्ड मिळू शकेल. हे पॅनकार्ड पीडीएफ फॉर्मेटमध्ये मोफत उपलब्ध होईल. वाचाः मोफत घरबसल्या पॅन कार्ड बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
  1. पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  2. यानंतर तुम्हाला क्विक लिंक्स सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे इंस्टेंट पॅन थ्रू आधार असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  3. तुम्हाला गेट न्यू पॅनवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
  4. स्क्रीनवर देण्यात आलेला कॅप्चा कोड भरा. यानंतर ओटीपी येईल.
  5. हा ओटीपी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरच येईल. यानंतर आलेला ओटीपी भरा.
  6. यानंतर आधारची माहिती मान्य करावी लागेल.
  7. पॅन कार्डसाठी ईमेल आयडी देखील द्यावा लागेल.
  8. यानंतर आधारची माहिती UIDAI द्वारे एक्सचेंज झाल्यानंतर एक इंस्टंट पॅन कार्ड जारी होईल. या सर्व प्रक्रियेला केवळ १० मिनिटे लागतात.
पॅन कार्डला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही चेक स्टेट्स/डाउनलोड पॅनमध्ये जाऊन आधार नंबर टाकून पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाउनलोड करू शकतात. पॅन कार्ड तुम्हाला पीडीएफ स्वरूपात ईमेलवर देखील येईल. यासाठी तुमचा ईमेल आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RepP41