Full Width(True/False)

कमवल्यानंतर त्यांनी हात वर केले, वडिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडेचा हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप

मुंबई: अभिनेत्री हिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी करोनामुळं निधन झालं. १५ दिवस त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू होते.पण अखेरीस त्यांची करोनाविरोधात सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. वडिलांच्या निधनामुळं अश्विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतीच तिनं एक पोस्ट शेअर करत हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तिनं यासंदर्भात एक सविस्तर अशी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिनं खासगी रुग्णालय प्रशासनासोबत तिथल्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. वाई व पंचक्रोशील लोकांसाठी महत्वाचे...!पेशंट दगावला म्हणून तोडफोड करणे हा पेशा नाही आपला कारण वैद्यकीय सेवा देत असलेल्या प्रामाणिक लोकांचा आदर आहे. पण जे घडले आहे त्यावर व्यक्त व्हावे लागेल, असं सुरुवातीला अश्विनीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आम्ही पोरके झालो. आमच्यासारखे आणखी कोणी पोरके होऊ नये हेच वाटतेय. नांनांचा करोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला म्हणून काळजीपोटी जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाई मधील बाबर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले.आम्ही त्यांना बाबर हॉस्पिटल, वाई इथे त्यांच्या कोरोनाची लागण झाल्याच्या चौथ्या दिवशी उपचारासाठी पाठवलं. यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा HRCT स्कोर काहीच नव्हता म्हणजेच त्यांना इन्फेकशन काहीच नव्हते मात्र शुगर ४०० कडे गेली होती. त्यांना भरती केले ते याच कारणासाठी. ज्या त्यांना रुग्णालयात दाखल केले त्या दिवशी त्यांचा HRCT स्कोर शून्य होता. त्याच माणसाचा ९ व्या दिवशी HRCT स्कोर २० कडे कसा काय जात असेल ? म्हणजे थोडक्यात डॉक्टर बाबर या नेमका सरकारचा कोणता प्रोटोकॉल अंमलात आणत होत्या ? कारण त्यांना जेव्हा केव्हा नानांच्या तब्बेतीबद्दल फोन केला तेव्हा त्यांनी मला हेच सांगितले की, सरकारच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही सगळे उपचार करत आहोत. वाचा अश्विनीची पोस्ट:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vIdc0g