Full Width(True/False)

'व्हर्जिनिटी कधी गमवायची?' आलियाने आईलाच विचारला प्रश्न

मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची मुलगी मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत. नुकताच फादर्स डेच्या निमित्तान आलियानं तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं वडील अनुराग कश्यपला सेक्स, रिलेशनशिप आणि प्रेग्नन्सी या विषयांवर प्रश्न विचारले होते. ज्याची अनुरागनंही बिनधास्त उत्तरं दिली. पण याआधी आलियानं तिची आई आरती बजाजलाही अशाप्रकारचे प्रश्न विचारले होते. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आलियानं तिच्या आईला काही असे प्रश्न या व्हिडीओमध्ये विचारले होते. जे शक्यतो मुलं आपल्या आईला विचारणं टाळतात. पण आलियाचं तिच्या आईसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आलियानं आपल्या आईला डेटिंगचं योग्य वय काय आहे असा प्रश्न विचारला होता. ज्याचं उत्तर देताना आरतीनं मजेदार अंदाजात सांगितलं, 'कधीच नाही.' त्यानंतर ती म्हणाली, 'कमीत कमी तुम्ही १८ वर्षांचे असायला हवे. त्याआधी डेटिंग करणं योग्य नाही.' याच्या उत्तरादखल आलियानं आपण १८ व्या वर्षापासूनच डेट करायला सुरुवात केली होती असं उत्तर दिलं. आलियानं या व्हिडीओमध्ये आपली आई आरती बजाजला पहिल्यांदा सेक्स करण्याबाबत म्हणजेच व्हर्जिनिटी गमावण्याबाबतही प्रश्न विचारला होता. ज्यावर आरती खूप चांगल्याप्रकारे उत्तर दिलं होतं. ती म्हणाली, 'कोणत्याही योग्य व्यक्तीसोबत जेव्हा तुम्ही मनापासून तयार असाल तेव्हा असं पाऊल तुम्ही उचलू शकता. पण कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येऊन असं करणं अजिबात योग्य नाही. कारण हे करून तुम्ही काहीच सिद्ध करण्याची गरज नसते.' आलियानं अनुराग प्रमाणे आरतीलाही हा प्रश्न विचारला होता की, 'जर समजा चुकून मी कधी प्रेग्नन्ट झाले तर आई म्हणून तुझी प्रतिक्रिया काय असेल?' यावर उत्तर देताना आरती म्हणाली, 'असं तू कधीच करायला नको कारण बाळाला जन्म देणं ही खूप मोठी जबाबदारी असते. सर्वात आधी तुम्ही तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. स्वावलंबी व्हायला हवं. माझ्या मते तुम्ही ३० वर्षांचे होण्याआधी बाळाला जन्म द्यायला नको.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jmeN8L