Full Width(True/False)

Redmi लाँच करणार ‘हा’ पॉवरफूल गेमिंग स्मार्टफोन, मिळतील जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक स्मार्टफोन विकणारी कंपनी गेमर्ससाठी आणखी एक खास स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन K series सीरिजमधील असेल. याआधी लाँच केलेल्या Redmi K40 चे गेमिंग व्हेरिएंट चा सक्सेसर ला लाँच करण्याच्या वृत्तांवर शाओमी ग्रुपचे अध्यक्ष लू वीबिंग यांनी शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे कंपनी लवकरच गेमिंग एडिशन फोन लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचाः पावरफुल प्रोसेसर शाओमी के५० सीरिजवर काम करत असून, लवकरच याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती समोर येईल. कंपनीच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडमीचा अपकमिंग फ्लॅगशिप MediaTek Dimensity १२०० प्रोसेसरसोबत येईल. यात शाओमीच्या हायपर चार्जिंग टेक्नोलॉजीसह पॉवरफूल बॅटरी मिळू शकते. रेडमी के40 गेमिंग एडिशनची वैशिष्ट्ये Redmi K50 Gaming Edition च्या स्पेसिफिकेशन्सचा अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, आधी लाँच झालेल्या Redmi K40 Gaming Edition मध्ये देखील जबरदस्त फीचर्स मिळतात. यावरूनच रेडमी के५० मध्ये काय फीचर्स मिळतील, याचा अंदाज बांधता येतो. रेडमी के४० गेमिंग एडिशनमध्ये ६.६७ इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल आहे. यात एचडीआर१० सपोर्ट मिळेल. हा फोन अँड्राइड ११ च्या MIUI १२.५ वर काम करतो व यात MediaTek Dimensity १२०० प्रोसेसर मिळतो. या फोनचे क्वॉलकॉम एडिशन देखील लाँच झाले आहे. या फोनमध्ये ६ जीबी/८जीबी रॅम आणि १२८ जीबी/२५६जीबी स्टोरेज पर्याय मिळेल. वाचाः बॅटरी आणि कॅमेरा Redmi K40 Gaming Edition मध्ये ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत ५०६५ एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा आणि ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरचा ट्रिपर रियर कॅमेरा सेटअप मिळेल. सोबतच ८ मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि २ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस मिळेल. हा फोन ५जी/४जी कनेक्टिव्हिटीसोबत येतो. रेडमी के५० गेमिंग एडिशनमध्ये देखील जबरदस्त फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SRMZy9