Full Width(True/False)

विवाहित दिग्दर्शकांशी कधीच शरीर संबंध ठेऊ नका- नीना गुप्ता

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या '' या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला आहे ज्याबद्दल आजतागातयत कोणाला फारशी माहिती नाही. आपल्या पुस्तकात बॉलिवूडमधील संघर्षापासून ते कास्टिंग काऊच पर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख करत बिनधास्तपणे आपलं मत मांडणाऱ्या नीना यांनी बॉलिवूडमध्ये नव्यानं आलेल्या अभिनेत्रींसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. विवाहित दिग्दर्शक किंवा निर्मात्यांसोबत कधीच शरीरसंबंध ठेवू नका असं नीना यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. आपलं आत्मचरित्र 'सच कहूं तो'मधील चॅप्टर 'इफ आय कुड टर्न बॅक टाइम...'मध्ये नीना यांनी लिहिलंय, 'कधीच विवाहित दिग्दर्शक किंवा निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवू नका. हे तुम्हाला जरी सामान्य वाटत असतं कारण हे सर्वच करतात आणि ते स्वीकारलंही जातं. पण असं करून पुन्हा कधीच तुम्ही त्या दिग्दर्शक किंवा निर्मात्यासोबत काम करू शकणार नाही.' नीना पुढे लिहितात, 'असं यामुळे होतं की, कोणत्याही व्यक्तीला अशी कोणतीच गोष्ट त्याच्या आजूबाजूला नको असते ज्याच्यामुळे त्याला त्रास होईल. तो तुमच्यासाठी स्वतःच्या पत्नीला कधीच सोडणार नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण तुम्ही पहिली स्त्री नसता. ज्याच्याशी त्याचे शरीरसंबंध आले आहेत. यात काही लोकांचा हेतू स्पष्ट असतो. पण काही असेही असतात जे तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. हे एक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडल्यासारखं असतं.' नीना म्हणतात, 'आता हे वाचल्यानंतरही अनेक मुली अशाप्रकारचे संबंध ठेवतीलच कारण ती व्यक्ती शक्तीशाली आहे. इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव आहे. त्याची पकड आहे. पण हे देखील सत्य आहे की, व्यक्ती आपल्या चुकांमधून शहाणा होतो आणि दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकणारे फार कमी आहेत.' नीना यांनी आपल्या चॅप्टरच्या शेवटी लिहिलंय, 'जर काही काळासाठी आयुष्यात मागे जाऊन काही गोष्टी बदलणं शक्य असतं तर मी अनेक बदल केले असते. पण आपल्याकडे ही सुविधा उपलब्ध नाहीये. आपण कितीही श्रीमंत झालो किंवा कितीही प्रसिद्ध झालो तरीही आपण फक्त घडून गेलेल्या गोष्टींबाबत विचार करू शकतो पण त्या बदलणं आपल्या हातात नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3y2aMdn