मुंबई: बॉलिवूड किंग आगामी काळात 'बादशाह' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण याच चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चाही मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक एटली हे करत आहेत. मागच्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या तरीही कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेले नाही. पण आता नयनताराच्या एका जवळच्या दिग्दर्शकानं या वृत्तामागचं सत्य सांगितलं आहे. नयनताराच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच या दिग्दर्शकानं नयनतारा सध्या तरी बॉलिवूड पदार्पण करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नयनतारा बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची अजिबात घाई नसल्याचं या दिग्दर्शकानं म्हटलं आहे. ती बॉलिवूडमध्ये काम नक्की करेल पण ते सध्या नाही असं या दिग्दर्शकानं एका हिंदी वेबसाइटशी बोलताना सांगितलं. तो म्हणाला, 'सध्या नयनताराला बॉलिवूड पदार्पणाची अजिबात घाई नाहीये. ती नक्कीच हिंदी चित्रपटांमध्ये काम करणार आहे. पण तिनं एटलीच्या आगामी चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. माझ्या मते सध्या एटलीही या प्रोजेक्टवर काम करत आहे. तोपर्यंत या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत.' नयनतारा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नयनतारानं २००३ साली 'Manassinakkare' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. अलिकडच्या काळात ती मल्याळम चित्रपट 'Nizhal' या चित्रपटात दिसली होती. तसेच आगामी काळात ती मिलिंद राओ यांचा चित्रपट 'Netrikann'मध्ये दिसणार आहे. दरम्यान शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं तक तो अखेरचा २०१८ साली 'झीरो' चित्रपटात दिसला होता. ज्यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि त्यानंतर शाहरुख कोणत्याच चित्रपटात दिसला नाही. पण येत्या काळात तो 'पठाण' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w4DARk