Full Width(True/False)

हॅकर्सपासून खासगी डेटा सुरक्षित कसा ठेवाल? फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली : आपल्या एका चुकीमुळे हॅक होण्याची शक्यता असते. अगदी सहज यूजरचा फोन हॅक करून करतात. हॅकर्स यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. मात्र, आपण थोडी काळजी घेतली तर डेटा चोरी होण्यापासून रोखू शकतो. काही टिप्स फॉलो करून तुम्ही डेटा चोरी होण्यापासून रोखू शकता. वाचाः या प्रकारे हॅकर्सपासून सुरक्षित ठेवू शकता डेटा 1. अनेक लोक आपल्या फोनमध्ये पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लावणे टाळतात. वारंवार टाकत बसण्याचा त्रास नको म्हणून असे केले जात आहे. मात्र फोनच्या सुरक्षेसाठी याची आवश्यकता असते. केवळ हॅकरच नाही तर तुमच्या आजुबाजूचे लोख देखील खासगी डेटा पाहू शकतात. यामुळे पोनला पासवर्ड, पिन अथवा पॅटर्नद्वारे सुरक्षित ठेवावे. 2. अनेकदा आपण थर्ड पार्टी अ‍ॅपला सुरक्षेचा विचार न करता डाउनलोड करतो. अनेक थर्ड पार्टी अ‍ॅपमध्ये लिंकचा समावेश असतो, ज्यात मालवेयरद्वारे फोनचा खासगी डेटा चोरी केला जातो. त्यामुळे नेहमी अ‍ॅप डाउनलोड करावे. 3. स्मार्टफोन कंपन्या वेळोवेळी फोनसाठी सिक्युरिटी पॅच अथवा सॉफ्टवेयर अपडेट उपलब्ध करत असतात. यातील अनेक सिक्युरिटी फीचर्स फोनसाठी आवश्यक असतात. कंपनीने फोनमध्ये सॉफ्टवेअर अथवा सिक्युरिटी अपडेट दिल्यास फोनमध्ये इंस्टॉल करावे. यामुळे फोन हॅकर्सपासून सुरक्षित राहतो. 4. जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कोणतीही लिंक आल्यास ती न तपासता ओपन करू नये. या लिंकच्या मदतीने हॅकर्स मोबाइलच्या सिक्युरिटीला हॅक करतात व फोनमधील खासगी डेटा मिळवतात. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काळजी घ्यावी. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fGOurq