Full Width(True/False)

Indian Idol 12- पुन्हा आठवेल ७० चं दशक, येणार झीनत अमान

मुंबई : हा कार्यक्रम विविध कारणांना चांगलाच गाजत आहे. अनेकदा हा कार्यक्रम वादातच अडकतो. स्पर्धकांचे सादरीकरण, कधी परीक्षकांमुळे तर कधी सूत्रसंचालकाच्या वादग्रस्त विधानांमुळे हा कार्यक्रम सातत्याने गाजत आहे. इतकेच नाही तर किशोर कुमार यांच्यावर सादर झालेल्या विशेष कार्यक्रमावरून निर्माण झालेला वाद अजूनही सुरूच आहे. या साऱ्या वादानंतरही हा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने बघतात. कार्यक्रमाच्या आगामी भागांमध्ये जुन्या काळातील ख्यातनाम अभिनेत्री पाहुण्या कलाकार म्हणून येणार आहेत. झीनत यांच्यावरील गाणी सादर करणार या आठवड्यात सर्व स्पर्धक अभिनेत्री झीनत अमान यांच्यावर चित्रीत केलेली गाणी सादर करणार आहेत. त्याचसोबत एव्हरग्रीन अभिनेत्री झीनत यांच्याशी संवाद साधत जुन्या काळातील काही आठवणींना उजाळा देणार आहेत. आपल्या करिअरबद्दल बोलल्या झीनत कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे पाहुणे कलाकार नेहमीच जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यामुळे नवीन पिढीला जुन्या काळातील कलाकार कसे काम करायचे, कशा अडचणी त्यांना यायच्या, त्यांचा संघर्ष कसा होता याची माहिती मिळते. अशाच काही आठवणी झीनत अमान यांच्याकडून ऐकता येणार आहेत. तसेच झीनत यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कशी केली याबद्दलही त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक हिमेश रेशमिया, अनु मलिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ७० च्या दशकामध्ये झीनत यांची जादू हिंदी सिनेसृष्टीमध्ये झीनत अमान यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ७० च्या दशकामधील सर्वाधिक बोल्ड अभिनेत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांनी देव आनंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शशी कपूर, संजीव कुमार या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. तसेच हरे रामा हरे कृष्णा, रोटी कपडा और मकान, वॉरंट, अजनबी, छलिया बाबू, मनोरंजन, सत्यम शिवम सुंदरम, दोस्ताना, कुर्बानी, अब्दुल्ला, तिसरी आँख, हमसे है जमाना यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केले होते. हे सिनेमे, त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uLmdnM