Full Width(True/False)

पार्टीतल्या या फोटोमध्ये तुम्ही रणबीर कपूरला शोधू शकता का?

मुंबई- बुधवारी आलिया भट्टने तिच्या आजोबांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी बहीण शाहीन आणि आई सोनी राझदान यांच्यासोबत त्यांनी आजोबांचा वाढदिवस साजरा केला. 'कलंक' स्टारने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी या बर्थडे पार्टीचे काही फोटोही शेअर केले. विशेष म्हणजे आलियाच्या आजोबांच्या वाढदिवसाला प्रियकर , त्याची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि भाची समारा हेदेखील उपस्थित होते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या रिद्धिमानेही या पार्टीची झलक इन्स्टा स्टोरीवर दाखवली. एका फोटोत ती आलियाच्या आजोबांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. तर याच फोटोच्या अगदी कोपऱ्यात रणबीर दिसत आहे. यावेळी रिद्धिमाने मुलगी समारा आणि आई नीतूसोबतचेही सेल्फी शेअर केले. एवढंच नाही तर आलिया, शाहीन आणि सोनी यांनाही तिने आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. सोनी राझदान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली. 'बाबा आज ९३ वर्षांचे तरुण झाले आहेत! जगातील सर्वोतम कथाकार.. ते स्वतः गोष्टी तयार करायचे. आमच्याकडेही नीलम आणि गगन नावाची सीरिज होती. ते मला आणि माझ्या बहिणीला आठवड्याच्या शेवटी या गोष्टी सांगायचे. तरुणपणात ते प्रख्यात बॅडमिंटन आणि स्नूकर खेळाडू होते याशिवाय ते अजूनही एक उत्साही गोल्फर आहेत (होय ते अजूनही गोल्फ खेळतात) एवढंच नाही तर ते आर्किटेक्टचा सराव अजूनही करतात. ते काय काय करतात याची यादी न संपणारी आहे. तसाच त्यांचा उत्साहही असीम आहे. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.' सोनी राझदान यांनी वडिलांचा फोटो शेअर केल्या नंतर नीतू कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xmrXWO