Full Width(True/False)

अरुणिताने पूर्ण केलं वडिलांचं अपूर्ण स्वप्न, इंडियन आयडलच्या मंचावर फादर्स डे सेलिब्रेशन

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम '' कायम वादाच्या भोवऱ्यात सापडत असला तरीही येता आठवडा प्रेक्षक आणि स्पर्धक दोघांसाठीही खास ठरणार आहे. येत्या आठवड्यात 'इंडियन आयडल १२' मध्ये फादर्स दे साजरा केला जाणार आहे. हा भाग आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी झटणाऱ्या वडिलांना समर्पित असणार आहे. अनु मलिक, सोनू कक्कर आणि हिमेश रेशमिया यांसमोर स्पर्धक एकाहून एक उत्कृष्ट गाण्यांचं सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमातील स्पर्धक 'मेरा कुछ सामान' या गाण्याचं सादरीकरण करणार आहे. सोबतच अरुणिता आपल्या वडिलांना अशी भेट देणार आहे जी पाहून अरुणिताचे वडील आश्चर्यचकित होणार आहेत. वाहिनीद्वारे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, अरुणिता गाणं संपल्यानंतर आपल्या वडिलांबद्दल बोलताना म्हणते, 'माझे वडील सगळ्यांच्या सुखांचा सगळ्यात आधी विचार करतात. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नेहमीच मला मदत केली. माझ्यासाठी ते माझी सपोर्ट सिस्टीम आहेत.' असं म्हणत अरुणिता आपल्या वडिलांच्या हातावर चक्क लंडन प्रवासाचं तिकीट ठेवते. ही खास भेट पाहून अरुणिताचे वडीलदेखील भावुक होतात. अरुणितासारखी मुलगी मिळणं हे त्यांचं भाग्य असल्याची भावना ते व्यक्त करतात. वडिलांना लंडनला पाठ्वण्याबद्दल अरुणिता म्हणते, 'माझे वडील नेहमी लंडन प्रवासाची स्वप्न बघायचे, पण आमची परिस्थिती फार बरी नसल्यामुळे त्यांचं स्वप्न कायम स्वप्नच राहिलं. त्यांनी प्रत्येक अडचणीत मला सावरलंय. मी त्यांना लंडनला जाण्याचं तिकीट देताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. मी त्यांची मुलगी आहे म्हणून मी स्वतःला नशीबवान समजते.' यासोबतच अरुणिताप्रमाणे पवनदीपचे वडीलदेखील कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांना पाहून पवनदीपही भावुक होतो आणि त्यांना घट्ट मिठी मारतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wDW0cE