Full Width(True/False)

स्मार्टफोन हरवलाय?, इंटरनेटविना फोनच्या लोकेशनवरुन 'असा' शोध घ्या

नवी दिल्ली. हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या स्मार्टफोनचे लोकेशन ट्रॅक करायचे असेल. तर, आम्ही आज तुम्हाला फोनचे लोकेशन ट्रॅक करतांना कामी येतील अशा टिप्स सांगत आहो. अनेकदा फोनचा डेटा बंद असतो. तर, कधी फ्लाईट मोड सुरु असते. अशात नेमके काय करावे हे कळत नाही. पण, आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण, काही सोप्प्या टिप्सचा वापर करुन अगदी कुणीही फोनचे लोकेशन शोधू शकेल. जाणून घ्या याविषयी सर्व डिटेल्स. वाचा : डेटा कनेक्शनशिवाय फोन कसा ट्रॅक करावा ? आपल्यातील बर्‍याच जणांच्या मनात हा प्रश्न असेल की डेटा कनेक्शन किंवा इंटरनेटशिवाय फोन ट्रॅक करू शकतो? तर, याचे उत्तर आहे हो ! तुम्ही हे सहज करू शकता. बरेच असे मॅपिंग अ‍ॅप्स आहेत जे फोन कोठे आहेत हे शोधण्यात मदत करू शकतात. फोनची जीपीएस सिस्टम दोन प्रकारे काम करते. जेव्हा आपल्या फोनमध्ये डेटा कनेक्शन असते किंवा जेव्हा वाय-फाय फोनमध्ये कनेक्ट केलेले असते . हे सहाय्यक जीपीएस किंवा ए-जीपीएस वापरते. हे फोनच्या जवळच्या सेल फोन टॉवर्सचे स्थान वापरून डिव्हाइसचे स्थान शोधण्यासाठी ज्ञात वाय-फाय नेटवर्कचे स्थान वापरते. Google मॅप्स च्या मदतीने करा ट्रॅक Google मॅप्स च्या मदतीने फोन ट्रॅक करता येतो. त्यासाठी ते सक्रिय असावे. आपल्याला आपल्या फोनवर माय डिव्हाइस शोधावे लागेल. आपण वापरत असलेल्या समान Gmail आयडीसह लॉग इन करणे आवश्यक आहे.याने तुमचे काम होईल. जर तुमचा फोन हरविला तर पुन्हा Google मॅप्स वर जावे लागेल. त्यानंतर मेनूवर जाऊन आपल्या टाइमलाइनवर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला तेथे तारीख टाकावी लागेल. ही तारीख तुमचा फोन हरविला त्या दिवसाची असावी. असे केल्याने हरविलेल्या फोनच्या सर्व स्थानाबद्दल माहिती मिळेल. फोन फ्लाईट मोडवर असल्यास काय करावे ? फोन फ्लाईट मोडवर असतांना जर हरविला. तर, मात्र त्या फोनचे लोकेशन ट्रॅक करणे कुणालाच शक्य होणार नाही. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gFeq7j