Full Width(True/False)

भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांना प्रमोशन, मायक्रोसॉफ्टने दिली 'ही' नवी जबाबदारी

नवी दिल्लीः भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना कंपनीने प्रमोशन दिले आहे. माइक्रोसॉफ्ट( Microsoft Corp) ने आता त्यांना सीईओवरून चेयरमन बनवले आहे. नाडेला आता जॉन थॉम्पसन यांची जागा घेणार आहेत. सत्या नाडेला यांना २०१४ साली मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनवण्यात आले होते. यानंतर LinkedIn, Nuance कम्युनिकेशंस आणि ZeniMax सारख्या कंपनीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. वाचाः कंपनीने सांगितले की, थॉम्पसन आता प्रमुख स्वतंत्र संचालक राहतील. थॉम्पसन हे २०१४ मध्ये बिल गेट्स नंतर मायक्रोसॉफ्टचे चेयरमन बनले होते. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आता कंपनीच्या कोणत्याही संचालक मंडळात नाही. तसेच ते बिल आणि मेलिंडा गेट्सच्या कामावर लक्ष देत आहेत. कंपनीने नुकतेच प्रति शेयर ५६ सेंटचा तिमाही लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात करोना मुळे जे नुकसान होत आहे. त्यामुळे सत्या नाडेला दुःखी होते. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच मदत सुद्धा केली. वाचाः हैदराबादेत झाले प्राथमिक शिक्षण सत्या नाडेला यांचा जन्म भारतातील हैदराबाद मध्ये १९६७ साली झाला होता. त्यांचे वडील एक प्रशासकीय अधिकारी होते. तसेच आई संस्कृत विषयातील प्राध्यापक होत्या. त्यांनी प्राथमिक शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमधून केल्यानंतर १९८८ मध्ये मणिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कम्प्यूटर सायन्स मध्ये एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी १९९६ मध्ये शिकागो मध्ये बूथ स्कूल ऑफर बिझनेसमध्ये एमबीए केले. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xpIlG4