Full Width(True/False)

तळीराम घरीच झिंगाट होणार; मोबाइल अॅप आणि वेब पोर्टलवरून दारुची होम डिलीवरी मिळणार

नवी दिल्लीः दिल्ली सरकारने दारूची होम डिलीवरीला मंजुरी दिली आहे. आता दिल्लीत मोबाइल अॅप आणि वेब पोर्टलवरून घरी बसून दारूची ऑर्डर करण्याची संधी मिळणार आहे. या मंजुरीला दिल्ली एक्साइज (सुधार) नियम, २०२१ ला आणले आहे. वाचाः जुन्या नियामांतर्गत दिल्लीत केवळ L-13 लायसन्स धारकांसाठी दारूची होम डिलीवरी करण्याची परवानगी होती. यासाठी ई-मेल किंवा फॅक्स द्वारे ऑर्डर केले जात होते. परंतु, आता नवीन एक्साइज नियमांतर्गत दिल्लीत आता मोबाइल अॅप किंवा पोर्टलवरून दारूची ऑर्डर केली जाऊ शकणार आहे. याचा अर्थ असा होत नाही की, सध्या दारुच्या दुकानांना अल्कोहोल डिलीवरी करण्याची परवानगी आहे. L-14 लायसन्सच्या दुकानदारांना दिल्लीत दारुची होम डिलीवरी करता येईल. याशिवाय, हॉस्टेल, ऑफिस, किंवा इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन दारुची डिलीवरी करण्याची परवानगी असणार नाही. ज्या लोकांना दारुची डिलीवरी हवी आहे त्या आधी त्यांना ऑर्डर करण्याआधी एक परमिट सुद्धा घ्यावे लागेल. वाचाः गेल्यावर्षी लॉकडाउन दरम्यान कोलकाता, महाराष्ट्र, ओडिशा, सिलिगडुडी आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यात दारुच्या होम डिलीवरीला मंजुरी देण्यात आली होती. मे २०२० मध्ये सुप्रिम कोर्ट ने कोविड १९ ला रोखण्यासाठी राज्यांना सल्ला दिला होता की, दारुची इनडायरेक्ट विक्री आणि होम डिलिवरी संबंधी विचार करायला हवा. अॅमेझॉन, बिग बास्केट, स्विगी आणि झोमॅटो सह अनेक प्लॅटफॉर्मने दारुची होम डिलीवरी सुरू केली आहे. वाचाः याशिवाय, केरळने दारुची होम डिलिवरीसाठी एक अॅप BevQ लाँच केले होते. या ठिकाणी दारुची ऑर्डर करण्यासाठी टोकन घ्यावे लागत होते. सोशल डिस्टेंसिंग लक्षात ठेऊन या अॅपची मागणी वाढली आहे. लाँचिंग नंतर काही तासात १ लाखाहून जास्त आकडा पार केला होता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wOboD2