Full Width(True/False)

फोन चोरीला गेलाय ? घरबसल्या मिळेल परत; करा हे काम

नवी दिल्ली : अनेकदा हरवतो अथवा चोरीला गेल्याचे समोर येत असते. छोट्याशी चुकीमुळे फोन चोरीला जातो. फोन चोरीला गेल्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र सोबतच खासगी डेटा लीक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे चोरीला गेलेला फोन परत मिळवायचा कसा ? असा प्रश्न समोर येतो. वाचाः तुम्ही चोरीला गेलेला फोन सोप्या पद्धतीने परत मिळवू शकता. यासाठी जास्त धावपळ देखील करावी लागणार नाही. ही पद्धत काय आहे जाणून घेऊया. वाचाः तक्रार नोंदवावी लागेल जर तुमचा फोन चोरी झाला असेल तर सर्वात प्रथम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा. तुम्ही ऑनलाइन देखील फोन चोरी झाल्याची तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर एफआयआर कॉपी आणि तक्रार नंबर नक्की घ्या. असा मिळवा फोन परत
  • यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला https://ift.tt/2SIwdiw या वेबसाइटवर जावे लागेल.
  • या वेबसाइटवर साइन करा. यानंतर तुम्हाला तीन पर्यायांपैकी एक Block Stolen / असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे मोबाइन नंबर, नंबर, FIR आणि मोबाइल बिल यासारखी माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर जेथे फोन हरवला अथवा चोरीला गेला त्या जागेचे नाव, जिल्हा, राज्य, पोलीस स्टेशन, एफआयआर नंबर आणि फोन कधी हरवला त्याची तारीख द्यावी लागेल.
  • आता तुमचे नाव आणि पत्ता टाका. यानंतर अपलोड करून सबमिट करा.
  • तक्रार केल्यानंतर तुमच्या चोरी झालेल्या फोनचा शोध सुरू होईल. फोनला ट्रेस केले जाईल.
  • तुमच्या फोनची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल सूचित केले जाईल.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p8lQ5s