मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या नात्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सुरू आहेत. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं असलं तरीही या दोघांनी मात्र त्यांचं नातं अद्याप ऑफिशिअल केलेलं नाही. पण लवकरच हे दोघं आपल्या नात्याची कबुली देण्याच्या तयारीत आहेत. खरं तर या दोघांच्याही चाहत्यांनाही त्यांच्या नात्याच्या घोषणेची उत्सुकता आहे. अशात आता कतरिनानं विकीला ऑनस्क्रीन इंटिमेट सीन न देण्याची ताकीद दिल्याचं बोललं जात आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २०२१चं स्वागत एकत्रच केलं होतं. या जोडीनं नवीन वर्ष अलीबाग येथे साजरं केलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत विकीचा भाऊ सनी आणि कतरिना कैफची बहीण इसाबेलही होती. त्यानंतर या दोघांच्या नात्याच्या चर्चा अधिकच होऊ लागल्या मात्र दोघांनीही या नात्यावर बोलणं नेहमीच टाळलं. पण सध्या या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. चर्चा आहे की, एकीकडे कतरिनाला विकीसोबतचं नातं ऑफिशिअल करायचं आहे तर विकीच्या वडिलांचा मात्र या नात्याला विरोध आहे. त्यामुळे नात्याबद्दल कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी विचार करण्याची ताकीद त्यांनी विकीला दिली आहे. विकी आणि कतरिना यांच्या डेटिंगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच आता कतरिना विकीच्या प्रोफेशनल लाइफमध्येही हस्तक्षेप करत असल्याचं बोललं जात आहे. तिनं विकीला यापुढे कोणत्याही चित्रपटात इंटिमेट सीन न करण्याची ताकीद दिल्याची चर्चा आहे. विकी कौशल लवकरच सारा अली खानसोबत 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटात दिसणार आहे. अशात कतरिनानं त्याला सारासोबत जास्त इंटिमेट सीन न देण्याचा सल्ला दिल्याचंही बोललं जात आहे. विकी कौशलनं या आधी ऑनस्क्रीन तापसी पन्नीसोबत 'मनमर्जियां', कियारा अडवाणीसोबत 'लस्ट स्टोरीज', अंगीरा धरसोबत 'लव पर स्क्वायर फुट' आणि शोभिता धूलिपालासोबत 'रमन राघव' या चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत. पण आता कतरिनाला विकीचं अशाप्रकारचे सीन देणं मान्य नाही आणि त्यामुळे तिनं त्याला असं न करण्याविषयी सुचवलं आहे. कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्यासोबत दिसणार आहे तर अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' या चित्रपटात दिसणार आहे. विकी कौशलबद्दल बोलायचं तर तो सुजीत सरकारच्या 'सरदार उधम सिंह' आणि आदित्य धरच्या 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे सॅम मानेकशॉ यांचा बायोपिकही आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3chLteU