नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स , आणि इंस्टाग्रामचा वापर प्रचंड वाढला आहे. मात्र, हे प्लॅटफॉर्म्स डाउन झाल्यावर समस्या निर्णाण होते. आता पुन्हा एकदा सकाळी जगभरात हे प्लॅटफॉर्म्स डाउन झाले होते. यामुळे लाखो यूजर्सला समस्येचा सामना करावा लागला. मात्र, काही वेळाने हे प्लॅटफॉर्म्स व्यवस्थित काम करू लागले. वाचाः जगभरात डाउन एका रिपोर्टनुसार, अमेरिका, मोरक्को, मॅक्सिको आणि ब्राझीलसह जगभरातील हजारो यूजर्सला फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि डाउनचा सामना करावा लागला. यावेळी यूजर्सला अ‍ॅप ओपन करण्यास आणि मेसेज पाठवण्यात अडचण येत होती. वाचाः भारतात देखील डाउन हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स भारतात देखील डाउन झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी लोकांनी हे अ‍ॅप ओपन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी मेसेज पाठवणे, सर्फिंग करणे आणि कमेंट करता येत नव्हते. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम डाउन झाल्यानंतर यूजर्सनी ट्विटरवर तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. अनेक यूजर्सनी मीम्स देखील शेअर केल्या. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wn0BzC