Full Width(True/False)

विक्री वाढवण्यासाठी खोटे अभिप्राय; अॅमेझॉन, गुगलची चौकशी सुरू

वृत्तसंस्था, लंडन ई-व्यापार व सर्च इंजिन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या अॅमेझॉन व गुगलकडून ब्रिटनच्या ग्राहक कायदा तसेच, अन्य कायद्यांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी द कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अॅथॉरिटीने (सीएमए) सुरू केली आहे. अॅमेझॉन व गुगलच्या मंचावरून अनेक उत्पादनांच्या जाहिराती तसेच, या उत्पादनांविषयीचे अभिप्राय प्रसारित होत असतात. उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी तेथे खोटे अभिप्राय देण्यात येत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून ते रोखण्यासाठी ही माध्यमे विशेष प्रयत्न करत नसल्याचा ठपका या नियामकाने ठेवला आहे. वाचाः या दोन कंपन्या ग्राहकहिताचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्या आहेत का, याचा अधिकृत तपास आम्ही सुरू केला आहे, असे सीएमएचे मुख्य अधिकारी अँड्रीया कॉस्केली यांनी शुक्रवारी सांगितले. आघाडीच्या वेबसाइटवरून प्रसारित होणाऱ्या उत्पादनांच्या खोट्या अभिप्रायांवर सीएमएचे गेल्यावर्षीपासूनच लक्ष आहे. या खोट्या अभिप्रायांमुळे व त्यांतील शिफारशींमुळे दिशाभूल झालेल्या लाखो ग्राहकांनी ती उत्पादने खरेदी केली असतील व त्यात त्यांचे पैसे वाया गेले असतील हा आमच्यासाठी काळजीचा विषय आहे. त्यामुळे अॅमेझॉन व गुगलकडून ग्राहक कायदा व अन्य कायद्यांचे उल्लंघन झाले आहे का, याचा आम्ही तपास करू, असे ते म्हणाले. वाचाः काही खोट्या अभिप्रायांमध्ये संबंधित उत्पादनांना पंचतारांकित मानांकन दिले जाते. त्यामुळे त्यांचा लाभ होतो. परंतु कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांचा यामुळे तोटा होतो, त्यांच्यावर अन्याय होतो या गोष्टीही विचारात घ्यायला पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. अॅमेझॉन व गुगलवरील हे आरोप सिद्ध झाल्यास खोट्या अभिप्रायांच्या प्रकारावर ते स्वत:हून काय कारवाई करतात ते पहावे लागेल. अन्यथा आमच्यापुढे कायदेशीर कारवाईचा पर्याय खुला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सहकार्य करू सीएमएकडून होत असलेल्या तपासास आम्ही सहकार्य करू, असे अॅमेझॉन व गुगलने म्हटले आहे. उत्पादनांविषयीचे अभिप्राय वस्तुनिष्ठ असावेत, याकडे आमचा कटाक्ष असून आम्ही आत्तापर्यंत २० कोटी खोटे अभिप्राय ग्राहकांनी पाहण्यापूर्वीच हटवले आहेत, असे अॅमेझॉनने सांगितले. उत्पादनांच्या अभिप्रायांविषयी आमचे धोरण अतिशय कठोर आहे, असे गुगलने म्हटले आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sucjdl