Full Width(True/False)

पटापट करायचेय ट्रेनचे तिकीट बुक ? वापरा 'ही' पद्धत, मिळवा १२ टक्क्यांपर्यंत सूट

नवी दिल्ली. हे तर सर्वांनाच माहिती आहे की, ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल तर त्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर, अ‍ॅपवर जावे लागते. किंवा तुम्ही ऑफलाइन देखील तिकिट बुक करू शकता. पण, त्यासाठी अनेकदा एजेंट्सची मदत घ्यावी लागते परंतु, आयआरसीटीसी वेबसाइट, अ‍ॅप आणि ऑफलाइन बुकिंगशिवाय एक मार्ग आहे. ज्याद्वारे तुम्ही अगदी घरी बसून ट्रेनची तिकिटे बुक करू शकता. जर तुम्हाला याबद्दल कल्पना नसेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. तुम्ही जर प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला रेल्वेच्या तिकिटांवर १२ टक्के सूट मिळेल. जी जास्तीत जास्त १२० रुपये असेल. वाचा : Amazon वरून असे करा रेल्वे तिकीट बुक
  • सर्वप्रथम आपल्याला Amazonअॅपवर जावे लागेल. यानंतर Amazon पे टॅबवर जा.
  • नंतर बुक तिकिटांवर जा आणि ट्रेन हा पर्याय निवडा.
  • नंतर आपण कुठे जाऊ इच्छिता त्याचे डिटेल्स भरा. तसेच, तारखेचा तपशील देखील प्रविष्ट करा.
  • तुम्हाला एसी तिकीट घ्यायचे असेल तर अ‍ॅपमध्ये दिलेल्या बॉक्सवर तुम्हाला ते चेक करावे लागेल.
  • यानंतर वापरकर्त्यांना फाईन्ड ट्रेनवर टॅप करावे लागेल. येथे आपल्याला अनेक रेल्वे पर्याय सापडतील.
  • अॅप तुम्हाला गाड्यांची उपलब्धता आणि मार्गांची माहिती देईल. आपण त्यानुसार कोणतेही एक निवडू शकता.
  • आपण सामान्य, ज्येष्ठ नागरिक किंवा महिला श्रेणी देखील निवडू शकता.
  • सर्व पर्याय निवडल्यानंतर,' पुढे जा' वर टॅप करा.
  • यानंतर आपल्याला आपले आयआरसीटीसी लॉगिन प्रमाणपत्रे द्यावी लागतील. आपल्याकडे आयआरसीटीसी खाते नसल्यास आपण आयआरसीटीसी वेबसाइटला भेट देऊन आपले खाते तयार करू शकता.
  • Amazon वर आयआरसीटीसी खाते तयार करण्याचा पर्याय देखील आहे.
  • एकदा आपण आयआरसीटीसी लॉगिन क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर आपल्या पसंतीनुसार पेमेंट पर्याय निवडून पेमेंट करू शकता.
वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gLQQ95