मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री हिने बॉलिवूड दिग्दर्शक याच्यासोबत लग्नगाठ बांधली. ४ जून रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले. आपल्या लग्नाबद्दल यामीने कोणालाही माहिती दिली नव्हती. यामीने लग्न झाल्याची घोषणा करताच चाहत्यांना आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला होता. लग्नाबद्दल न सांगितल्याने चाहते यामीवर नाराज होते पण आता मात्र यामीच्या लग्नाचे फोटोपाहून चाहत्यांचा रुसवा कुठल्याकुठे पळून गेला आहे. यामीच्या नववधूच्या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. चाहत्यांनी यामीला लग्नाच्या शुभेच्छा देत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यामीने तिच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात लग्नातील निरनिराळ्या विधींचे फोटोदेखील आहेत. हळदीपासून ते मेहंदीपर्यंत असे अनेक फोटो यामीने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. यामीदेखील नववधूच्या वेशात खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. फोटोंमध्ये यामीच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश आहे. काही फोटोमध्ये यामी तिची छोटी बहीण सुरीलीसोबत दिसत आहे. सुरीलीने देखील यामीच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोत सुरीली यामीला हळद लावताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते यामीचं खूप कौतुक करत आहेत. यामीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कित्येक कलाकार यामीला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. यामीने लग्नाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं हे मात्र नक्की.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3x35DBE