Full Width(True/False)

तब्बल आठ वर्षांपासून जेमी लिवरचा संघर्ष सुरू; म्हणाली वडिलांनी कधीही...

मुंबई : बॉलिवूडमध्ये 'नेपोटिझम'चा वाद चांगलाचा गाजत आहे. कलाकारांचा मुलांना अथवा मुलींना जर या क्षेत्रात यायचे असेल तर अक्षरशः रेड कार्पेट अंथरले जाते, त्यामुळे त्यांचे या विश्वात विनासायास पदार्पण होते. अर्थात यावरून टीका ही होतेच. परंतु याला अपवादही येथेच आहेत. हा अपवाद आहे ख्यातनाम विनोदी अभिनेते यांची मुलगी जेमी लिवरचा. इतक्या मोठ्या अभिनेत्याची मुलगी असूनही या क्षेत्रामधला तिचा संघर्ष आठ वर्षांनंतरही सुरूच आहे. तिच्या या संघर्षाबद्दल ती एका मुलाखतीमध्ये मोकळेपणाने बोलली आहे. काय म्हणाली जेमी हिची ओळख आजही प्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिवर यांची मुलगी अशीच आहे. तिला अभिनयाच्या क्षेत्रामध्ये स्वतःची अशी ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी आठ वर्षांपासून ती काम शोधत आहे. परंतु अद्याप तिला यश मिळेल असे काम मिळालेले नाही. चांगल्या संधीची आजही तिला प्रतिक्षा आहे. याबाबत जेमीने सांगितले, ' मला अभिनयाच्या क्षेत्रातच करीअर करायचे आहे. ते ही स्वतःच्या बळावर करायचे आहे. त्यामुळे मी आतापर्यंत वडिलांची मदत घेतलेली नाही अथवा त्यांनी देखील माझी शिफारस कुणाहीकडे केलेली नाही अथवा शिफारसीसाठी फोनही केलेला नाही. त्यांनी तसे करावे असे मी कधीही त्यांना सुचवले देखील नाही.' बाबांमुळेच मी आज जमिनीवर आहे जेमी पुढे म्हणाली, ‘भारतामधील सर्वश्रेष्ठ विनोदी अभिनेत्यांपैकी एक म्हणून माझ्या वडिलांचे जॉनी लिवर यांचे नाव घेतले जाते. साडेतीन दशके ते मनोरंजन विश्वामध्ये काम करत आहेत. आतापर्यंत १३ वेळा त्यांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले आहे. एका काळ असा होता की, प्रत्येक निर्माता, दिग्दर्शकाला त्यांच्या सिनेमामध्ये जॉनी लिवर हवेच असायचे. अशा ख्यातनाम वडिलांची मुलगी असल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.’ तिने पुढे सांगितले, , ' माझ्या वडिलांच्या प्रसिद्धीचे, त्यांच्या भोवती असलेल्या ग्लॅमरबद्दल आम्हाला कधीच अप्रूप नव्हते. आम्हाला बाबांनी त्यापासून दूर ठेवले होते. इतकेच नाही तर आम्हाला सर्वसामान्य मुलांसारखेच त्यांनी कायम वाढवले. एका प्रसिद्ध कलाकाराची आम्ही मुले आहोत म्हणून आम्हाला कधीही खास वागणूक मिळाली नाही. बाबांनी केलेल्या या प्रयत्नांमुळेच आम्ही आजही जमिनीवर आहोत...' जे काम मिळाले ते स्वतःच्या कष्टाने लहानपणापासून असे संस्कार झाल्यामुळे जेमीला जे काही करायचे आहे ते स्वतःच्या बळावर करायचे आहे. आतापर्यंत ज्या ज्या प्रोजेक्टमध्ये जेमीने काम केले आहे, ते सर्व तिने स्वतःच्या गुणावर मिळवले आहे. ती म्हणते, 'मला या गोष्टीचा आनंद आहे की मला जी कामे मिळाली ती माझ्या हिंमतीवर आणि माझ्या गुणांमुळे मला मिळाली. कुणी माझी शिफारस केली म्हणून ती कामे मला मिळाली नाहीत.' जेमीचा एक कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ दिग्दर्शक फरहाद सामजीला कुणी तरी दाखवला. त्याला तो खूप आवडल्याने जेमीची 'हाऊसफुल ४' या सिनेमामध्ये निवड झाली. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून करीअरला सुरुवात जेमी लिवरने २०१२ मध्ये लंडनस्थित मार्केट रिसर्च एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्सिक्युटिव म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ती मुंबईतील द कॉमिडी स्टोरीमध्ये स्टँड अप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. तिने काही कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आणि 'किस किसको प्या करूं' आणि 'हाऊसफुल ४' या सिनेमांमध्ये तिने काम केले. जेमी लिवर मिमिक्री करण्यात माहिर आहे. तिने रानी मुखर्जी, सोनम कपूर, करीना कपूर, हेमा मालिनी यांची हुबेहुब नक्कल करते. वडिलांनीही कधी कामासाठी हात पसरले नाहीत भले जेमी लिवरचे बस्तान मनोरंजन सृष्टीमध्ये अद्याप म्हणावे तसे बसलेले नाही. परंतु हळूहळू का होईना तिला कामे मिळत आहेत आणि तिचे बस्तान बसत आहे. नाही तर लोकांचे करीअर आठ वर्षांमध्येच संपून जातात. जेमी जो संघर्ष करत आहे तो पाहून कुणालाही प्रश्न पडेल की तिचे वडील इतके मोठे कलाकार आहेत मग तिने काम मिळवण्यासाठी त्यांची मदत का नाही घेतली. या प्रश्नाचे उत्तर देताना जेमीने सांगितले, ' हा गुण मला वडिलांकडूनच मिळाला आहे. कारण त्यांनी देखील कामासाठी कुणापुढे हात पसरले नव्हते. जे काही त्यांनी केले स्वतःच्या बळावर,जिद्दीवर केले. त्यामुळे जेव्हा त्यांनी पाहिले की आपली मुलगी देखील आपल्यासारखेच स्वतःच्या बळावर गोष्टी करू इच्छित आहे. तेव्हा त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला आणि मला जे काही मी करत आहे, त्याला पाठिंबा दिला आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vE1R12