Full Width(True/False)

BSNL vs Jio : जिओच्या ९८ रुपयांच्या रिचार्जपेक्षा बीएसएनएलच्या ‘या’ प्लानमध्ये मिळतात अधिक फायदे, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने नुकतेच आपल्या ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानला रीलाँच केले आहे. मात्र, आपल्या ग्राहकांना ९७ रुपयांचा प्लान ऑफर करते. बीएसएनएलचे अनेक प्लान्स आहेत, जे जिओ पेक्षा अधिक चांगले आहेत व चांगली ऑफर देतात. वाचा : जिओने गेल्या वर्षी ९८ रुपयांच्या प्लानला अचानक बंद केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हा प्लान ग्राहकांसाठी आणला आहे. जिओच्या ९८ रुपये आणि बीएसएनएलच्या ९७ रुपयांच्या प्लानमध्ये कोणती कंपनी अधिक फायदा देते, ते पाहुयात. बीएसएनएलचा ९७ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या ९७ रुपयांच्या या प्लानमध्ये वॉयस कॉलिंग बेनिफिट मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लानची वैधता १८ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा असा एकूण २८ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये कॉन्टेंटचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. वाचा : जिओचा ९८ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता १४ दिवस असून, यात एकूण २१ दिवस डेटा ग्राहकांना मिळतो. या प्लानमध्ये , , , जिओ न्यूज अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. दोन्ही प्लानची तुलना केली तर जिओपेक्षा बीएसएनएलच्या प्लानमध्ये अधिक फायदे मिळतात. मात्र नेटवर्क क्वालिटी आणि डेटा स्पीडच्या बाबतीत रिलायन्स जिओचा प्लान अधिक चांगला आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vOiwiu