Full Width(True/False)

१५१ रुपयांत ४० जीबी डेटा, BSNLचा हा प्लान जिओच्या पुढे, पाहा बेनिफिट्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () ने नुकतेच ५ नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. हे सर्व प्लान कोणत्याही डेटा लिमिट सोबत येतात. यात एक प्लान २४७ रुपयांचा आहे. जो महिनाभर चालतो. जिओच्या २४७ रुपयांच्या प्लानहून जास्त सुविधा बीएसएनएलचा १५१ रुपयांचा प्लान देत आहे. बीएसएनएलच्या प्लानमध्ये डेटाचा वापर करण्यासाठी कोणतीही लिमिट नाही. जाणून घ्या या प्लानचे खास वैशिष्ट्ये. वाचाः BSNL चा १५१ रुपयांचा प्लान कंपनीने गेल्या वर्षी वर्क फ्रॉम होम डेटा व्हाउचर्स आणले होते. हा प्लान त्यातील एक आहे. बीएसएनएलच्या १५१ रुपयांच्या व्हाउचर मध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता सोबत ४० जीबी डेटा दिला जातो. या डेटाचा वापर कधीही केला जाऊ शकतो. तसेच या प्लानमध्ये Zing सब्सक्रिप्शन फ्री दिले जात आहे. परंतु, यात कोणत्याही प्रकारे कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा दिली जात नाही. वाचाः जिओचा २४७ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा २४७ रुपयांचा प्लान मध्ये ३० दिवसांची वैधता मिळते. यात ग्राहकांना २५ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा विना कोणत्याही डेटा लिमिट शिवाय येतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. याशिवाय, JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारखे अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः कोणत्या प्लानमध्ये जास्त फायदा बीएसएनएलच्या प्लानमध्ये १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना जास्त १५ जीबी डेटा दिला जात आहे. दोन्ही प्लानची वैधतेत २ दिवसांचा फरक आहे. परंतु, जिओचा प्लान हा कॉलिंग आणि एसएमएस सोबत येतो. तर बीएसएनएलच्या प्लानमध्ये ही सुविधा दिली जात नाही. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35kSGXN