Full Width(True/False)

रियलमीच्या या स्मार्टफोनवर ८ हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर, १२ जून पर्यंत स्वस्तात खरेदी करा

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर Mobile Saving Days चे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये महागड्या स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला या सेलमध्ये अनेक चांगले पर्याय मिळतील. फोनवर अनेक ऑफर्स दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. तसेच, एक्सचेंज ऑफर आणि एचडीएफसी डेबिट कार्ड ईएमआय ट्रांजॅक्शनवर १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट दिल जात आहे. या सेलमध्ये कोणत्या फोनवर काय ऑफर्स आहेत जाणून घेऊया. वाचाः narzo 30A: या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. मात्र याला ८,४९९ रुपयात खरेदी करता येईल. ही किंमत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. यावर ८,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ग्राहकांना पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोनला ९४९ रुपयात खरेदी करता येईल. नो-कॉस्ट ईएमआयवर देखील फोनला खरेदी करता येईल. तसेच काही ईएमआय ऑफर्स देखील मिळतील. Tecno Spark 7: या फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. परंतु, ऑफरसह फोनला ७,४९९ रुपयात खरेदी करता येईल. फोनवर ७,१०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जुना फोन एक्सचेंज करून पूर्ण ऑफर मिळाल्यास केवळ ३०० रुपयात हा फोन घरी नेता येईल. नो-कॉस्ट ईएमआयवर देखील फोनला खरेदी करता येईल. तसेच काही ईएमआय ऑफर्स देखील मिळतील. वाचाः OnePlus 9R 5G: वनपल्सच्या या स्मार्टफोनला ३९,९९९ रुपयात खरेदी करता येईल. ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. यासोबत ११,१०० रुपये एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोनला २८,८९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ईएमआय ऑफर्स मिळत आहे. तसेच, फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. Oppo F17: या फोनची किंमत २०,९९९ रुपये. मात्र, फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १६,९९० रुपयात खरेदी करता येईल. यावर ११,१०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन ५,८९० रुपयात खरेदी करता येईल. यासोबत काही ईएमआय ऑफर्स दिल्या जात आहे. तसेच, नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. Redmi 9: या फोनची किंमत १०,९९९ रुपये आहे, मात्र याला ८,७९९ रुपयात खरेदी करू शकता. ही किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. यावर ८,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोन फक्त ४४९ रुपयात तुमचा होईल. यावर ईएमआय ऑफर देखील दिली जात आहे. तसेच, फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w66a5B