Full Width(True/False)

Dilip Kumar: दिलीप कुमार यांना पुन्हा केलं ICU मध्ये भरती

मुंबई: दिग्गज अभिनेता यांना पुन्हा एकदा इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना २९ जूनला सकाळी हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांना ICU वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या निरक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. महिन्याभरात ही दुसरी वेळ आहे जेव्हा दिलीप कुमार यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना १० दिवसांपूर्वीच इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला होता. इस्पितळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९८ वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांना एका नॉन कोव्हिड -१९ आयसीयू वार्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं मंगळवारी पुन्हा एकदा इस्पितळात दाखल करण्यात आलं. श्वसनाचा त्रास आणि त्यांचं वय पाहता कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांची प्रकृती स्थीर असून त्यांना काही डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. या आधीही ६ जूनला दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसांमध्ये बाइलेटरल प्ल्यूरल इफ्यूजन असल्याचं निदान झालं होतं. ज्यामुळे फुफ्फुसांच्या आजूबाजूला पाणी तयार होतं. डॉक्टरांनी प्‍ल्‍यूरल एस्‍प‍िरेशनच्या मदतीनं हे पाणी काढलं होतं. त्यानंतर ५ दिवस रुग्णालयात ठेवल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. रुग्णालयात दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यादेखील उपस्थित आहेत. दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर' आणि 'राम और श्याम' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जवळपास ५ दशकं ते भारतीय चित्रपटसृष्टीतील नंबर १ सुपरस्टार राहिले आहेत. त्यांनी शेवटचं १९९८ साली 'किला' या चित्रपटात काम केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dvMq4a