Full Width(True/False)

आता यूजर्सला Instagram Reels मध्ये दिसणार जाहिराती

नवी दिल्ली : टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर भारतात रील्सची लोकप्रियता वाढली आहे. आता रील्समध्ये एक नवीन फीचर देण्यात आले आहे. आता इंस्टाग्राम रील्स व्हिडीओ पाहताना यूजर्सला जाहिरात दिसणार आहे. गेल्या काही महिन्यात ठराविक देशात Instagram च्या टेस्टिंगनंतर आता जगभरात अधिकृतपणे लाँच करण्यात आले आहे. वाचाः इंस्टाग्रामने अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, या जाहिराती व्यावसायाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास मदत करतील. ज्यामुळे लोक ब्रँड आणि इन्फ्लूएन्सरद्वारे नवीन कॉन्टेंट शोधू शकतील व पाहू शकतील. स्टोरीजच्या जाहिरातीप्रमाणे इंस्टाग्राम जाहिरात पूर्ण स्क्रीन आणि लांब आकारात दिसतील. रिल्स व्हिडीओ पाहताना यूजर्सला या जाहिराती दिसतील. नियमित रील्सप्रमाणेच या जाहिराती ३० सेंकदांच्या असतील. यूजर्स या रील्स एड्सवर कॉमेंट्स करू शकतील, लाइक्स, सेव्ह आणि शेअर करू शकतील. वाचाः या जाहिराती रील टॅब, स्टोरीज, एक्सप्लोर आणि तुमच्या फीड्सवर दिसतील. इंस्टाग्राम यूजर्स या जाहिरातींना मॅनेज देखील करू शकतील. 'इंस्टाग्रामवर कोणत्याही अन्य जाहिरातींप्रमाणेच आम्ही देखील लोकांना त्यांच्याद्वारे दिसणाऱ्या रील्स एड्सला कंट्रोल करण्याची संधी देतो', असे इंस्टाग्रामने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. म्हणजेच, जाहिरात न आवडल्यास हाइड करणे आणि रिपोर्ट करण्याचा पर्याय देखील यूजर्सला मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vIV4Cq