Full Width(True/False)

अखेर YouTubeने iPhone-iPad यूजर्ससाठी आणले 'हे' खास फीचर, व्हिडीओ पाहताना करता येईल चॅटिंग

नवी दिल्ली : प्लॅटफॉर्म ने आणि साठी अखेर पिक्चर-इन-पिक्चर (PiP) मोड जारी केला आहे. PiP सपोर्ट मिळाल्याने यूजर्स आता डिव्हाइसवर दुसरे अ‍ॅप्स वापरताना युट्यूब व्हिडीओ पाहू शकतील. वाचाः यूजर्सने YouTube अ‍ॅप बंद केल्यानंतर व्हिडीओ छोट्या विंडोमध्ये दिसतील. या विंडोला यूजर्स स्क्रिनच्या इतर कॉर्नर्सला देखील हलवू शकतील. यूट्यूबचे PiP फीचर अँड्राइड यूजर्ससाठी अँड्राइड Oreo पासूनच उपलब्ध आहे. मात्र आता iOS यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. युट्यूबने म्हटले आहे की, हे फीचर त्याच iOS यूजर्ससाठी उपलब्ध होईल, ज्यांच्याकडे YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन आहे. कंपनी लवकरच अमेरिकेत सर्व यूजर्ससाठी हे फीचर रोलआउट करणार आहे. या फीचरच्या मदतीने व्हिडीओला मिनी प्लेयरमध्ये पाहता येईल. सोबतच, व्हिडीओ पाहताना देखील मोबाइलमधील इतर गोष्टी वापरता येतील. वाचाः जर तुमच्या यूट्यूबवर PiP मोड बंद झाले असेल तर तुम्ही व्हिडीओ प्ले करून ते सुरू करू शकता. यानंतर होममध्ये जाण्यासाठी स्वाइप करा. स्वाइप केल्यानंतर व्हिडीओ लहान विंडोमध्ये सुरू राहिल. तुम्ही विंडोला स्क्रीनवर तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेऊ शकता व रिसाइज करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xBlpUf