नवी दिल्लीः जर तुम्हाला नवीन अॅप्पल आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सध्या बिग सेव्हिंग डेज सेल (Big Saving Days sale) सुरू असून या सेलमध्ये iPhone 11 आणि स्मार्टफोन्सला कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकते. डिस्काउंट शिवाय, फ्लिपकार्टवर SBI क्रेडिट कार्ड धारकांना १० टक्के सूट वेगळ्या पद्धतीने दिली जात आहे. हा सेल १६ जून २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. वाचाः iPhone 11 ला ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करा iPhone 11 स्मार्टफोनला ६४ जीबी स्टोरेजचे मॉडल ४९ हजार ९९९ रुपयांत विकले जात आहे. तर १२८ जीबी स्टोरेजचे मॉडल ५६ हजार ९९९ रुपये आणि २५६ जीबी स्टोरेजचे मॉडल ६६ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. याशिवाय, तुमच्याकडे SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले 12MP + 12MP चा रियर कॅमेरा, 12MP चा फ्रंट कॅमेरा आणि A13 बायोनिक चिपसेट दिले आहे. वाचाः iPhone XR ला ३९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करा फ्लिपकार्ट सेल मध्ये iPhone XR स्मार्टफोनच्या ६४ जीबी स्टोरेज मॉडलला ३९ हजार ९९९ रुपये आणि १२८ जीबी मॉडलला ४२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डवर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. या फोनमध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि A12 बायोनिक चिपसेट सारखे फीचर्स दिले गेले आहेत. वाचाः iPhone SE ला ३१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करा बाकीच्या मॉडल प्रमाणे अॅप्पल iPhone SE ही स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ४६ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय, SBI क्रेडिट कार्ड वर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. फोनमध्ये ४.७ इंचाचा डिस्प्ले, १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि A13 बायोनिक चिपसेट सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xicWFx