नवी दिल्ली : ला काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच करण्यात आले होते. लाँचिंगनंतर आता या स्मार्ट फिटनेस बँडची आजपासून (१४ जून) विक्री होणार आहे. हे २४ तास हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसोबत येते. यात सेंसर देखील देण्यात आले आहे. तसेच, फुल चार्जिंगमध्ये १४ दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल. वाचाः Honor Band 6 भारतात , , च्या फिटनेस बँडला टक्कर देईल. या फिटनेस बँडमध्ये १.४७ इंचाचा टच सपोर्ट AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात तीन स्ट्रॅप कलर व्हेरिएंट मिळेल. यामध्ये कोरल पिंक, मीटिओराइट ब्लॅक आणि सँडस्टोन ग्रेचा समावेश आहे. Band 6 चे स्पेसिफिकेशन्स Honor Band 6 मध्ये १.४७ इंच टच सपोर्ट AMOLED कर्व्ड ग्लास डिस्प्ले मिळतो. यात TruSeen ४.० तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बँडमध्ये २४ तास हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 सेंसर सारखे फीचर्स मिळतात. डिव्हाइस ५ ATM वॉटर रसिस्टेंस देखील आहे. यात झोपेचा पॅटर्न समजण्यासाठी स्लिप ट्रॅकिंग फीचर देखील मिळले. वाचाः या स्मार्ट फिटनेस बँडमध्ये १८०mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १४ दिवसांच्या बॅटरी बॅकअपसोबत येते. यात ब्लूटूथ ५.० मिळेल. ५ ATM रेटिंग असल्याने फिटनेस बँड लवकर पाण्यात खराब होत नाही. यात आउटडोर वॉकिंग, इंडोर वॉकिंग, आउटडोर रनिंग, इंडोर रनिंग, आउटडोर सायकलिंग, इंडोर सायकलिंग, स्लीप ट्रॅकिंग, मेंस्ट्रुअल ट्रॅकिंग, कॉल-मेसेज नॉटिफिकेशन सारखे स्पोर्ट्स मोड देखील मिळतील. Honor Band 6 ची किंमत Honor Band 6 ची किंमत ३,९९९ रुपये आहे. याची विक्री १४ जूनला दुपारी १२ वाजता सुरू होईल. डिव्हाइसला ई-कॉमर्स वेबसाइट वरून खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवरून खरेदी करताना क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट देखील मिळेल. तर १० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय ट्रांझॅक्शन अथवा ७५०० रुपयांच्या RuPay ट्रांझॅक्शन वर ७५ रुपये सूट मिळेल. या फिटनेस बँडला नो-कॉस्ट EMI सह खरेदी करता येईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U5xYZK