नवी दिल्ली : जगभरात सीरिजची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या फोनला सप्टेंबर महिन्यात लाँच केले जाण्याची शक्यता आहे. लाँचिंग तारीख आणि स्पेसिपिकेसबाबत कंपनीकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, याचे काही फीचर्स आणि मॉडेल नंबरची माहिती लीक झाली आहे. आता सीरिजच्या मोबाइल्सच्या मॉडेल नंबरची माहिती समोर आली आहे. १३ सीरिजमध्ये iPhone 13, iPhone 13 Pro, Max आणि iPhone 13 Mini सारखे फोन असण्याची शक्यता आहे. वाचाः नुकतेच च्या मोबाइल्सच्या मॉडेल्सला (Eurasian Economic Commission) साइटवर पाहण्यात आले आहे. EEC साइटवर आयफोन सीरिजमधील फोन्सचे A2628, A2630, A2634, A2635, A2640, A2643 और A2645 हे मॉडेल नंबर पाहण्यात आले. फोन्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, तरीही काही वैशिष्ट्यं समोर आली आहेत. आयफोन १३ सीरिजमधील फोन्सचा लूक आणि डिझाइन सीरिज प्रमाणेच असल्याचे सांगितले जात आहे. याआधी आलेल्या रिपोर्टनुसार, आयफोन १३ थोडा जाड असण्याची शक्यता आहे. वाचाः संभाव्य वैशिष्ट्ये iPhone 13 series फोन्समध्ये अन्य आयफोन्सच्या तुलनेत लहान नोच मिळेल. या सीरिजमध्ये डीएसएलआर सारखा कॅमेरा मिळू शकतो. याचा डिस्प्ले देखील १२० हर्ट्ज डिस्प्ले रिफ्रेश रेटचा असेल. या व्यतिरिक्त आयफोन १३ बाबत एक खास गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मोबाइल्समध्ये अँड्राइड स्मार्टफोनप्रमाणेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. सोबतच, फोन्सला लेटेस्ट प्रोसेसरसोबत लाँच केले जाईल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x87R2y