Full Width(True/False)

iPhone 13 ची रिलीज डेट आली समोर, मास्क घातल्यानंतरही फेस अनलॉक फीचर काम करणार

नवी दिल्लीः लाखो भारतीयांना Apple iPhone 13 स्मार्टफोन कधी येतोय, याची उत्सूकता लागली आहे. या दरम्यान आता आयफोन १३ च्या लाँचिंग वरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अॅप्पल आपल्या आयफोन सीरीजला सप्टेंबर महिन्यात लाँच करीत असतो. यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की, अॅप्पल कंपनी एका मोठ्या कार्यक्रमात आयफोन १३ ला लाँच करेल. अॅप्पल इंसाइडरच्या रिपोर्टनुसार, मिंग-ची कुओ यांच्या म्हणण्यानुसार, अॅप्पल २०२२ च्या पहिल्या सहामाहीत नवीन ५जी आयफोन एसई सुद्धा रिलीज करू शकतो. यानंतर आयडी डिस्प्ले आणि स्वस्त किंमतीसोबत फ्लॅगशीप आयफोन १४ मॉडलला आणू शकते. वाचाः आयफोन १३ चे फीचर्स Apple iPhone मध्ये 13 TSMC 5nm प्रोसेस आणि A15 चिपसेट दिले जाऊ शकते. TrendForce च्या एका रिपोर्टनुसार, परफॉर्मेंस मध्ये Apple चे iPhone 12 सीरीजच्या स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone 13 ३० टक्के जास्त कारगर आणि २० टक्के जास्त स्मार्ट असतील. IPhone 12 सीरीजच्या स्मार्टफोन मध्ये A14 बायोनिक चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. याला गेल्यावर्षी लाँच करण्यात आले होते. वाचाः या दरम्यान, iPhone 13 सीरीज़ सॅमसंगची LTPO स्क्रीनला स्पोर्ट करू शकते. स्क्रीनच्या 120Hz रिफ्रेश रेट सोबत येण्याची शक्यता आहे. प्रोसेसर म्हणून आयफोन १३ सीरीजला कंपनी आपल्या लेटेस्ट A15 Bionic प्रोसेसर सोबत लाँच करू शकते. जे 4nm process वर बनले गेले आहे. अॅप्पलच्या या प्रोसेसरची मॅन्यूफॅक्चरिंग सुरू करण्यात आली आहे. अपकमिंग iPhone 13 मध्ये युजर्संना मास्क घालून फेस अनलॉक फीचरने आपल्या फोनला अनलॉक करू शकते. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येते. जे फेस आयडी फीचर सोबत येईल. वाचाः iPhone 13 ची किंमत Apple iPhone 13 ची किंमत iPhone 12 सीरीज़च्या तुलनेत समान असू शकते. ज्याला $ 699 च्या सुरुवाती किंमतीवर लाँच केले होते. iPhone 13 च्या प्रो वेरिएंटची किंमत 1099 डॉलर पर्यंत होती. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x1LEmY