Full Width(True/False)

बाप रे, अवघ्या एका सेकंदात ११५ कोटी रुपयांच्या iPhone ची विक्री

नवी दिल्लीः ने एका सेल मध्ये जबरदस्त प्रदर्शन करीत एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. JD.com के डेटा नुसार, चीनमध्ये iPhone ने ६१८ व्या सेलमध्ये अखेरच्या दिवशी हा रेकॉर्ड बनवला आहे. अवघ्या एका सेकंदात १०० मिलियन युआन म्हणजेच ११५ कोटी रुपयांच्या आयफोनची विक्री केली आहे. या सेलमध्ये दुसऱ्या कंपन्यांच्या फोनचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला राहिला आहे. परंतु, अॅप्पलने या सेलमध्ये सर्वांना मागे टाकले. वाचाः अॅप्पलला हुवावेच्या घसरणीचा मिळाला फायदा चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अॅप्पलच्या आयफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. याच्या मागे कारण म्हणजे हुवावेची मार्केटमध्ये घसरण सुरू आहे. अमेरिकेत बंदी घातल्यानंतर हुवावेला खूप स्ट्रगल करावे लागत आहे. हुवावेला सर्वात मोठा झटका ज्यावेळी लागला त्यावेळी गुगलने त्यांचा सपोर्ट करणे बंद केले आहे. या कारणामुळेच हुवावे आता आपला ऑपरेटिंग सिस्टम HarmonyOS डेव्हलेप करीत आहे. वाचाः या कंपन्यांनी केली एका मिनिटात १०० मिलियनची विक्री चीनमध्ये नुकत्या पार पडलेल्या सेलमध्ये हायर, मीडिया आणि ग्री ने एक मिनिटात १०० मिलियनची विक्री केली आहे. तर सीमेन्स आणि शाओमीने तीन मिनिटात १०० मिलियन युआनची विक्री केली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, इयर ऑन इयर सेलमध्ये सॅमसंगच्या सेलमध्ये २०० टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, रियलमी आणि iQOO च्या सेलने आधीच १५ मिनिटात इयर ऑन इयर सेल मध्ये ६ पट वाढ नोंदली आहे. तसेच या सेलमध्ये अॅक्टिव नॉइज कन्सलेशन इयरफोन्सच्या विक्रीत आधीच १० मिनिटात २६० टक्के इयर ऑन इयर ग्रोथ नोंदली गेली. वाचाः गेल्या वर्षीच्या तुलनेत JD चा टर्नओव्हर १० पट वाढला कंपनीने सांगितले की, इयर-ऑन-इयर सेल मध्ये JD सुपरमार्केटचा ओव्हरऑल टर्नओवर १० पट वाढला आहे. या सेलमध्ये जास्त मर्चेंट्स आणि स्टोर्स ने गेल्या वर्षी झालेल्या सेलचा रेकॉर्ड मोडला आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, यावेळी सेलमध्ये कंपन्यांचे सिंगल स्टोरची सरासरी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूम आधीच्या तुलनेत ४.३ पट जास्त होता. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35PARk9