नवी दिल्लीः जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करीत असाल तर तुम्हाला जास्त डेटाची गरज पडते. जिओने यासाठीच अनेक जबरदस्त प्लान लाँच केले आहेत. ज्यात तुम्हाला डेली ३ जीबी डेटा मिळेल. कंपनीकडून ३४९९ रुपयांचा प्लान ऑफर करण्यात आला आहे. ज्यात तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता, डेली ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक दुसऱ्या सुविधा मिळतात. याशिवाय, एका महिन्याच्या रिचार्ज करायचे असेल तर जिओचा ४०१ रुपयांचा मस्त प्लान आहे. जिओच्या या प्लानला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणि जिओचेही ३ जीबी डेटाचे मस्त प्लान उपलब्ध आहेत. पाहा कोणता प्लान बेस्ट आहे. वाचाः Jio चा ४०१ रुपयांचा 3GB प्लान जिओच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. सोबत या प्लानमध्ये ग्राहकांना ६ जीबी डेली अतिरिक्त डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, Disney+Hotstar VIP , Jia Tv, My Jio Cinema, आणि Jio Security Apps चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः Vodafone Idea चा ४०५ रुपयांचा 3GB प्लान जिओच्या या प्लानला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये वोडाफोनचा जबरदस्त ४०५ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये डेली 3GB डेटा मिळतो. सोबत तुम्हाला 6GB डेली अतिरिक्त डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100SMS ची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये Disney+ Hotstar VIP चे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः Airtel चा ३९८ रुपयांचा 3GB डेटाचा प्लान एअरटेलचा हा प्लान खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तो ३९८ रुपयांत मिळतो. या प्लानमध्ये रोज 3GB डेटा मिळतो. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS ची सुविधा मिळते. या प्लानमध्ये Airtel Xstream Premium ,Wink Music आणि Shaw Academy चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x6VIex